दवांत आलीस भल्या पहाटे कविता (इयत्ता अकरावी ) | Davant Alis Bhalya Pahate Kavita
नमस्कार, स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics !!!! वर आज या पोस्ट मध्ये आपण दवांत आलीस भल्या पहाटे कविता मधून बघणार आहोत. इयत्ता अकरावीच्या कुमारभारतीच्या पाठयपुस्तकांमध्ये अभ्यासाला आहे. बी सी मर्ढेकर यांनी हा कविता लिहिलेली आहे.
दवांत आलीस भल्या पहाटे कविता
दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा
जवळून गेरीत पेरित आपूल्या
तरल पावलांमधली शोभा
अडलीस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलीस ;
- मागे,
वळूनी पाहणे विसरलीस का ?
विसरलीस का हिरवे धागे ?
लक्ष्य कुठे अन कुठे पिसासा,
सुंदरतेचा कसा इशारा ;
डोळ्यांमधल्या डाळींबांचा
सांगत धरावा कैसा पारा !
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग !
तळहाताच्या नाजूक रेषा
कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या
तांबूस निर्मल नखांवरील अन्
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या
दवांत आलीस भल्या पहाटी
अभयारण्य शोभेत एकदा
जवळून गेलीस पेरीत आपूल्या
मंद पावला मधल्या गंधा
- बि. सी. मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
तर आज आपण दवांत आलीस भल्या पहाटे कविता बघितले अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏
Post a Comment