Header Ads

Navratrila Navrupe Tu Lyrics | नवरात्रीला नव रुपे तू (भक्तीगीत )



नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Navratrila Navrupe Tu Lyrics बघणार आहोत.

Navratrila Navrupe Tu Lyrics

|| सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तूते ||

नवरात्रीला नव रुपे तू
लेऊनीया येसी || धृ ||

अवघारुपी परी माऊली एकच तू होसी
अवघारुपी परी माऊली एकच तू होसी
जय अंबे जगदंबे
जय अंबे जगदंबे
नवरात्रीला नव रुपे तू || १ ||

प्रतिपदेला घटस्थापना
घटी बसते आई
द्वितीयेस रेणुका शोभती
उदो कार होई..
तृतीयेस शृंगार साजरा
मिरवीत अष्टभुजा
चतुर्थीस तू जगन माऊली
शंभूचे गिरीजा

उपांगलीला पंचमीस तू
उपांगलीला पंचमीस तू
व्रत भावे करिते
जय अंबे जगदंबे
जय अंबे जगदंबे
नवरात्रीला नव रुपे तू ||२||

षष्ठीला तुज कवडा अर्पूण
गोंधळ घालिती
सप्तमीस तू सप्तशृंगी
गड चढून जासी ...
अष्टमीस सह्याद्री पार्वती
उभी माय असते

नवमीला नवरात्र कारणे
नवमीला नवरात्र कारणे
होम हवन करिती
दशमीला सिंहावर बसूनी
शीरंगना जासी..
जय अंबे जगदंबे
जय अंबे जगदंबे
नवरात्रीला नव रुपे तू || ३ ||

* * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण Navratrila Navrupe Tu Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.