आरशातली स्त्री कविता ( इयत्ता दहावी ) | Arshatali Stree Kavita Iyatta Dahavi
नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण आरशातली स्त्री कविता बघणार आहोत. इयत्ता दहावीच्या कुमारभारती च्या पाठ्यपुस्तकातील हे कविता आहे. हिरा बनसोडे ( १९३९) या कवितेच्या कवयित्री आहेत. स्त्रीच्या आयुष्यातल्या बदलांचे अचूकपणे वर्णन करणारी ही कविता आहे. बाल्य तेजस्वी तारुण्यमधील स्वप्न ध्येय कुठल्या कुठे जाऊन एखादी स्त्री अचानक इतकी प्रज्ञा बनते की तिचे तिलाच कळत नाही असा आशय कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने व्यक्त केलेला आहे.
आरशातली स्त्री कविता ( इयत्ता दहावी)
सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले
आरशातील स्त्रीने मला विचारले, 'तूच ना गं ती!
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
कितीही बदललीस ग तू अंतर बाह्य .... !!
तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग
ऐक हं..! तू कशी होतीस ते !
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका
अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
मी आज नक्षीकांत तू.. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी !
आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिवळटलेले, खस्कन देह तोडलेल्या फुलांसारखे
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळते मात्र अहोरात्र पारंपारिक त्याचे वरदान समजून
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचे भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी
अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते
रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून
शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय
मी पदराखाली जातेस देहा मधल्या असंख्य कळा '
तिचे हे बोलणे ऐकतात मी स्वतः हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारित जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली -
' रडू नकोस खुळे, उठ ! आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात
मी घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले'
- हिरा बनसोडे
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- वस्तू कविता इयत्ता दहावी
- जय जय हे भारत देशा कविता इयत्ता दहावी
- गे माय भू तुझे मी कविता
- पद्मा गोळे यांच्या कविता
- ग दि माडगूळकर यांच्या कवितांचा संग्रह
तर आज आपण आरशातली स्त्री कविता - इयत्ता दहावी बघितली. अधिक कविता आणि मराठी लिरिक्स वाचण्यासाठी ला True Marathi Lyrics पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment