Header Ads

सेवानिवृत्ती कविता संग्रह मराठी | SevaNivrutti Kavita Marathi


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण सेवानिवृत्ती कविता मराठी बघणार आहोत. सेवानिवृत्तीच्या वेळी म्हणण्यासाठी च्या कविता तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

    सेवानिवृत्ती कविता मराठी

    🔰🔰🙏🌹🌹💐💐💐🌹🌹🔰🔰

    कविता - 1

    काळा थांबशील कारे जरासा ....
    काळा थांबशील का रे जरासा
    मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचय

    नकळत घडून गेलेल्या चुकांसाठी
    क्षमा त्यांची मागायचय
    आयुष्याच्या या वळणावरती
    थोडसं मागे वळून पाहायचंय
    घडून गेलेल्या घटनांना अंतकरणात जपायचय ..
    काळा थांबशील का रे जरासा
    मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचय ...

    कसे जातील माझे दिवस
    तुमच्या सर्वांच्या शिवाय
    याचं हितगुज तुमच्यासमोर मांडायचय
    मनात ओथंबून आलेल्या भावनांना
    मला मोकळ करायचय
    काळा थांबशील का रे जरासा
    मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचय ...

    तुमच्यासारखी माणसं जीवनात लाभली
    त्याबद्दल आभार तुमचे मानायचय
    आयुष्याच्या संध्याकाळी शेवटपर्यंत
    साथ तुमची सुटू नये प्रार्थना अशी करायचय
    काळा थांबशील का रे जरासा
    मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचय

    माझ्या जाण्यानंतरही
    माझ्या कार्यक्षेत्राची भरभराट होताना
    मला पाहायचय ...
    माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी
    प्रार्थना मला करायचय ....
    काळा थांबशील का रे जरासा
    मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचय ...

    मला माहित आहे, तू थांबणार नाहीस
    तरी तुला मला विनवायचय
    काळा, खरच थांब रे जरासा
    मला माझ्या प्रियजनांना काही बोलायचय

    ༄ ༄ ༄ ༄ ༄ ༄ ༄ 

    कविता - 2

    कितीही सुखद असली तरी
    कुठेतरी संपणारी वाट असते
    पण संपणाऱ्या वाटे सोबतच
    जन्मनारी नवी पहाट असते
    तेव्हा आजचा हा निरोपाचा सोहळा
    आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता
    उज्वल भवितव्याची पहाट ठरावी
    या शुभेच्छा .....

    ༄ ༄ ༄ ༄ ༄ 

    कविता - 3

    सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते
    निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते
    धागे असतात जळलेले हृदयाचे हृदयाशी
    आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसत

    ༄ ༄ ༄ ༄ ༄ 

    कविता - 4

    निरोपाच्या वेळी घ्यायचे नसतात हातात हात
    स्पर्श असतो सांभाळायचा मखमली हृदयात

    निरोपाच्या वेळी नसतात
    मोजायचे भूतकाळातले क्षण
    हसून असतात स्वच्छ करायचे
    हृदयावरचे सारे व्रण

    निरोपाच्या वेळी जराही व्हायचं नसतं निराश
    मनापासून घ्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकाश

    निरोपाच्या वेळी फक्त एवढंच असतं करायचं
    समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी
    आपल्या डोळ्यात घ्यायचं

    ༄ ༄ ༄ ༄ ༄ 

    कविता - 5

    येथून दूर जाताना डोळे भरून आले
    येथून दूर जाताना का दुःख आज झाले
    वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही
    येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही

    ༄ ༄ ༄ ༄ ༄ ༄ ༄ 

    कविता - 6

    सुगंधी आठवणीची कुपी देऊन सेवानिवृत्त होताय
    दिवस उजाडता निरोपाचा सारे गोड क्षण
    चोहीकडे दरवळू पाहतायत
    आपले हे नाते असेच सदा अबाधित राहो
    तुमच्या गोड स्वभावाप्रमाणे
    तुमचे आयुष्य सदा सुखा समाधानाने जावो

    - मोहिनी Dp

    ༄ ༄ ༄ ༄ ༄ 

    कविता - 7

    वाटा वेगळ्या नाही होत आहेत या
    बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे
    निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळी
    आपल्या सोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे
    निवृत्ती म्हणजे पोचपावती

    आपण आपल्या कामाची
    चोख कामगिरी बजावल्याची .....
    निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड
    खूण आपण अमुक जागी पोहोचल्याची

    निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा
    जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा
    निवृत्ती म्हणजे मोका, शांत निवांत आयुष्य
    मागे वळून बघण्याचा

    थोडासा कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे
    आपल्यासाठी सगळेच दिवस
    रविवार असतील इथून पुढे
    सणावाराला होणाऱ्या गाठीभेटी ऑफिस ऐवजी
    आपल्या घरीच होतील इथून पुढे

    उगाच डोळ्यात पाणी बिनी आणायची
    गरज नाही बरं का !!!
    मित्र आता कुठल्याही भलत्या वेळी
    कॉल करतील इथून पुढे !!!
    आता मस्त टेन्शन फ्री जगायचं
    आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं

    गायन, वाचन, भटकंती .....
    तब्येतीला परवडेल ते सगळं सगळं करायचं
    आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झालीय
    स्कोर साठी नाही आनंदासाठी खेळायचं

    - यशवंत दीडवाघ

    ༄ ༄ ༄ ༄ ༄ ༄ ༄ 


    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर आज आपण या पोस्टमध्ये सेवानिवृत्ती कविता मराठी बघितली.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.