आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Birthday Kavita For Mother
नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे !!!! या पोस्टमध्ये आपण आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बघणार आहोत. 'आई' या शब्दातच खूप जादू आहे. प्रत्येकाचं आपल्या आईवर खूप प्रेम असतं. पण ते सर्वच जण व्यक्त करत नाहीत. मला वाटतं एक कोणत्यातरी एखाद्या दिवशी आई बद्दलचे प्रेम व्यक्त न करता नेहमी तिच्यासोबत प्रेमाने वागले पाहिजे. फक्त एवढीच अपेक्षा तिची असते.आईच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला उद्देशून कविता म्हणून दाखवल्या तर खरंच तिला आनंद होईल अशाच काही कविता तुम्हाला इथे वाचायला मिळतील.
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
👩 😍😍😍👩
कविता - १
आई किती करावे तुझे कौतुकशब्द अपुरे पडती माझे
परतफेड नाही करू शकत
त्या उपकारांची तुझ्या
अमृता वानी मला तू पाजीलास ग पान्हा
जसे यशोदेच्या मांडीवर कृष्ण बाळ तान्हा
गुण अवगुणांचा माझ्या केला तू विलय
सर्व गुन्हे माफ होती असे तुझे न्यायालय
तुझ्या कुशीतली झोप आजच्या संसारात नाही
पुढचा जन्मही तुझ्या गर्भात मिळो ही वाट मी पाही
जगावे पुन्हा पुन्हा येऊन मी तुझ्या पोटी
सर्वच दुनिया तुझ्याविना वाटे मला खोटी
तूच माझ्या जीवनाची पालटलीस ग काया
साष्टांग नमन करूनी पडतो तुझ्या पाया
प्रेम तुझे आहे आई या जगाहून भारी
म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
- वैभव कैलास भारंबे
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ♥️🎂🎂💐🎁🎁🎁
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
कविता - २
खरंच ग आई तुझ्याशिवाय
सारच खूप अर्धवट वाटतं
तू हसली नाहीस ना
कि ते हसणं पण नकोस वाटतं
आई तू घरात असतेस ना जेव्हा
तेव्हा घर खूप प्रसन्न राहत
तू दिसेनाशी झालीस ना
की ते घरही खूप उदास राहतं
नेहमीच आई तू
फक्त निस्वार्थपणे प्रेम करतेस
स्वतःचा विचार न करता
तू फक्त आपल्या
मुलांसाठी जगत असतेस
आई तू असलीस तरी
आवाजातला हळुवारपणा
लगेच ओळखतेस
आज काहीतरी बिघडलंय ना तुझं
असं म्हणून लगेच तू मन हळवं करतेस
नात्यांमधला अर्थ तू खूप सहजपणे समजतेस
गुंतलेल्या त्या नात्यांची गाठ
तू अलगदपणे सोडवतेस
आई तुला खरं सांगू
तू आमच्या सुंदर जग आहे
तुझ्याशिवाय आमच्या आयुष्य
खरच ग पण अपूर्ण आहे
- तृप्ती समीर तिल्लू
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
कविता - ३
आई ... काय लिहू ग तुझ्यासाठीतुझे प्रेम शब्दात व्यक्त करणे
अवघड आहे ग माझ्यासाठी !!!!!
हो आज जन्मदिवस आहे तुझा
पण तुझा जन्म झाला नसता
तर मी या जगात नसते .....
आई ... खरे स्वर्ग ना
या जमिनीवर फक्त तुझ्या
गर्भाशयात असते ... !!!
आई .... तुझे उपकार कुठे फेडावे ?
तुझे आभार कसे मानावे ?
म्हणूनच देवाकडे फक्त एकच मागणं
तुझ्या मरणाअगोदर मला मरण यावे
आणि माझे आयुष्य ही तुलाच लागावे ... !!!
आई तुझी जेवढी प्रशंसा
कौतुक सन्मान आणि स्तुती
करावी तेवढी कमीच आहे
कारण हे निसर्ग सुद्धा
तुझ्या प्रेमासमोर सीमित आहे
आई .... जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला नेहमी आनंदी, समाधानी पहावे हीच इच्छा ... !!!!
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
कविता - ४
दाटता कंठ माझा
दहिवले शब्द लेखणीचे
ऋण तुझे अनेक
आई शब्दातच सामावले जग सारे
वात्सल्याचे तू मूर्ती
प्रत्येक स्त्रीमध्ये तूच वसे
लेकरावर जीव ओवाळणारी
शिकवते निस्वार्थ प्रेम कसे
आई तुझा दिवस नाही
तुझ्यामुळेच सारे दिवस दिसे
लाभू देत पुण्याई अशी
सारे जन्म तुझ्याच उदरात मिळे !!!
Happy birthday Aai 🥳🎉🎊❣️❣️
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
कविता -५
शब्दच नाही आई, तुझे गुणगान गायला
जन्म तू मला दिलास, या जगात यायला
कसे तुझे उपकार फेडू सांग बरे
तुझ्या विना या जगात आहे का कोणी खरे
शब्दच नाही आई, तुझे गुणगान गायला
हवा, पाणी, सूर्य, चंद्र सर्वच आहे साक्षीला
धरती आणि अंबर सोबत होते तुझ्या
देवाने ही जन्म घेतला आई तुला पाहायला
शब्दच नाही आई, तुझे गुणगान गायला
- सुषमा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥰🥰❤️🔥❤️🔥🎂
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
कविता - ६
सगळ्यांचं सगळं करत आलीस
कधी थकली असशील, दमली असशील
पण तरीही नेहमी आनंदात दिसणारी तू
कधीही अपेक्षा नाही तुला कसलीच
सतत हसत आमच्यावर प्रेम करतेस
आमच्या सुखदुःखात बरोबर असतेस
आज तुझ्या वाढदिवस
आज तरी करू दे थोडेसे लाड तुझे
अशा माझ्या आईला देवा उदंड आयुष्य लाभू दे
तिच्या इच्छा, तिची स्वप्न पूर्ण करण्याची
सध्याचे आम्हाला मिळू दे
हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना
Happy Birthday Aai 💓💓💓💓
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
कविता - ७
कुठून लिहू कसं लिहू शब्द गावत नाही
तशी कधी चार ओळीत आई मावत नाही
थकतात सारे थकते घर, ती थकेल कुठली
तिच्या इतक जगात साऱ्या कुणीच धावत नाही
अंधारून येते वाट दिसेनाशी होते
ती होते दिवा बोट धरून पुढे नेते
ठेच लागो कळ येवो, परके होतात सगळे
सावलीसारखी सोबत माय पदर होऊन येते
कळत नाही तिचं मन तिला मात्र कळतं
कुणा काय हवं ते प्रत्येकाला मिळतं
हसत असते नेहमी कधी अश्रू दावत नाही
सांगत देखील नाही कधी मन तिचं जळतं
भेगाळलेल्या टाचा बाभुळ साली सारखे हात
ठेवत असते आशादाई डोळ्यात नेहमी वात
डोईवरून हात फिरवत कुशीत घेऊन म्हणते
जाईल बाळा, चालत राहा अंधाराची रात ...
जिंकतो मी जरी वासरात लंगडी शहाणी गाय
हरकून पाणी होते जसे जग जिंकले काय
तीच म्हणते हात जोड देवाजीला तेव्हा
देव्हाऱ्यात देवा जागी दिसते माझी माय
तिच्या वाचून घरदार अंगण पाहवत नाही
नात्यामधला धागा दुसरा कुणीच ओवत नाही
खरं सांगून लिहायला शब्द गावत नाही
तशी कधीच चार ओळीत आई मावत नाही
Love you Aai 💝💝💝 Happy birthday
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- जीवनावर हृदय स्पर्शी मराठी कविता
- Birthday Marathi Kavita Charolya
- Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
- बाबावर कविता मराठी
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment