Header Ads

Nakavarchya Ragala Aushadh Kay Marathi Song Lyrics | कळत नकळत | नाकावरच्या रागाला


नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला Nakavarchya Ragala Aushadh Kay Marathi Song Lyrics वाचायला मिळतील. हे गाणं कळत नकळत या मराठी मूवी मधलं आहे. अशोक सराफ यांनी हे गाणं गायलेलं आहे तर सुधीर मोघे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. चला तर मग बघूया नाकावरच्या रागाला औषध काय या गाण्याचे लिरिक्स -


सॉंग - नाकावरच्या रागाला औषध काय
मुव्ही - कळत नकळत (1989 )
लिरिक्स - सुधीर मोघे
सिंगर - अशोक सराफ
म्युझिक - आनंद मोडक


Nakavarchya Ragala Aushadh Kay Marathi Song Lyrics

नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय ?
नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय ?

माझी लाडली माझी गोडली
सांगा आमच्या छकुलीला झालं तरी काय ?
नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय ?

( त्याचं काय झालं होती मुलगी एकदा की नाही ती जाम रुसली जाम रुसली जाम रुसली कोपऱ्यात जाऊन बसली. )

काही केल्या हसेना, कुणाशी बोलेना
साऱ्या घराला असं झालं की
साऱ्या घराला असं झालं की
तेव्हा काय खरं नाय

नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय ?

( मग तिला समजवायला कोण कोणाला माहितीये ? )

आधी आलं अस्वल, बसलं मारून फतकल
आधी आलं अस्वल, बसलं मारून फतकल

कारण त्याच्या लक्षात आलं
कारण त्याच्या लक्षात आलं
त्याच्या चड्डीच तुटलय बक्कल
त्याच्या चड्डीच तुटलय बक्कल
त्याच्या चड्डीच तुटलय बक्कल
त्याच्या चड्डीच तुटलय बक्कल

मग आला ससा,
मग आला ससा,
पांढराशुभ्र लोकरीचा गूंडा कसा म्हणतो
बघा बघा मी तिला हसवतो कसा
पण झालं काय माहितीये
गेला रडत रडत स्वतः च ढसाढसा

माकडोबा आले उडी मारत टना टना
इवल्या बावल्या केल्या पण त्याचीही दैना
एक पण काय कुणाचंच काय चालेना उपाय
चालेना चालेना चालेना उपाय ....

मग आला मामा.... उंदीर मामा ??
उंहु .... मग चांदोमामा !!!!
नाही रे छोटू मामा , त्याचा काही न्याराच छंद
पाहून सारा राजरंग तो म्हणतो कसा
मंडळी हो ऐका सांगतो गोष्ट दोन मुलांची
पांडूची बंडूची ,पांडू आणि बंडूची ....

पांडू आणि बंडू दोन होती मुलं
एक होतं शहाणं एक होतं खुळ
पांडू होता हुशार बंडू होता मठ्ठ
पांडू ऐके आईचं, बंडू करी हट्ट
पांडू होता पट्ट्या बंडू होता रड्या
पांडू खाई पेढे बंडू खाई छड्या
आय आय आय..... आय

पांडू होता गुणी बंडू होता गुच्छ
मी आहे पांडू आणि बंडू कोण ?? तूच !!!!
तूच तूच तूच.... तूच
अरे ही पोरगी बोलली की आणि हसली सुद्धा

नाकावरच्या रागाला औषध काय
ला ला ला
नाकावरच्या रागाला औषध काय

नाकावरच्या रागाला औषध काय
गालांचा थवा न ओठांची साय




हे पण नक्की वाचा 👇👇👇

तर आज या पोस्टमध्ये आपण Nakavarchya Ragala Aushadh Kay Marathi Song Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.