अंबाबाई ची आरती | Ambabai Chi Aarti
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं एक जागृत देवस्थान म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई किंवा कधी कधी महालक्ष्मी असेही म्हणतात. या स्थानाला दक्षिण कशी म्हणून पण ओळखले जाते. हे मंदिर खूप प्राचीन काळात बांधले गेले असून काळ्या दगडात केलेले आहे. हे चालुक्य काळात बांधण्यात आल्याचे कळते. आज या पोस्ट मध्ये आपण अंबाबाईबद्दल जाणून घेणार आहोत आणि अंबाबाई ची आरती पण बघणार आहोत.
महालक्ष्मीचे अनेक अवतार आहेत. तिने महिषासुर मर्दिनी बनून महिषासुराचा वध केला तर दुर्गा बनून दुर्गासुराचा वध केला आणि कोल्हासुरमर्दिनी बनून कोल्हासुराचा वध केला. कोल्हासूर राक्षसाने मरताना देवीला वर मागितले कि माझ्या मृत्यूनंतर माझ्या गावाला माझे नाव मिळावे म्हणून नंतर या गावाला कोल्हापूर हे नाव माळले. कोल्हापूर हे अतिशय पवित्र क्षेत्र असून हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या क्षेत्राच्या नरसिंहवाडी हे दत्ताचे पवित्र स्थान आहे तर दुसऱ्या बाजूला प्रयोगाचा संगम आहे जिथे पंचगंगा नदी भोगावती , तुळशी , कुंभी कासारी आणि आता अस्तित्वात नसलेल्या गुप्त अशा सरस्वती नदीला मिळते.
अंबाबाई ची आरती
सुख सदने शशी वर्दने अंबे मृगनयनी ||
गजगमने सूर नमने कोल्हासूर मथने ||
सुरवर वर्षीती सुमने करोनि या नमने ||
भय हरणे सुख करणे सुंदर शिव रामने ||
जय देवी जय देवी ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी || धृ ||
मृगमद मिश्रित केशर शोभते ते भाळी ||
पुंचीत केश विराजित मुक्तातून भाळी ||
रत्न जडित सुंदर अंगी कातोळी ||
चिदधनाचा गाभा अंबा वेंधाळी ||
जय देवी जय देवी || १ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||
कंठी विलसत सगुणा मुक्तसुविशेषे ||
पितांबर सुंदर कासीयला कासे ||
किती किती कांची धनी मंजुळ भासी ||
पदकमळा लावण्या अंबा शोभतसे ||
जय देवी जय देवी || २ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||
झळ झळ झळ झळकती तानवने करणी ||
तेजा लोपून गेले रवी शीश निज करणी ||
ब्रम्हा हरिहर सकलीत नेणती ताव करणी ||
अद्भुत लीला लिहिता न पुरे हि धरणी ||
जय देवी जय देवी || ३ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||
अष्टही भुजा सुंदर भासीतसी शोभा ||
झग झग झग झागित लावण्य प्रभा ||
मघ मघ मघ मघ माघीत सुमनांची शोभा ||
त्र्यंबक मधुर होऊनि वर्णितसे शोभा ||
जय देवी जय देवी || ४ ||
जय देवी जय देवी जय हो जय अंबे ||
कोल्हापूरची स्वामिनी तूच हो जगदंबे
जय देवी जय देवी ||
हे पण वाचा 👇👇👇
- Aai Tulja Bhavani Aarti
- Santoshi Mata Aarti Lyrics
- Mahalaxmi Aarti Lyrics
- रेणुका देवीची आरती
- Navratri Aarti Lyrics
- Durge Durgat Bhari Aarti Marathi
- Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti
धन्यवाद🙏🙏🙏
Post a Comment