Header Ads

वाचा रेणुका देवीची आरती - जय जय जगदंबे


नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपन रेणुका देवीची आरती बघणार आहोत . आपन इथे ही आरती मराठी भाषमधून बघणार आहोत . चला बघुया रेणुका मातेची आरती -

Renuka Aarti Marathi | Lyrics

जय जय जगदंबे | श्री अंबे | 
रेणुके कल्पकदंबे | जय जय || धृ ||

अनुपम स्वरुपाची तुझी धाटी |
 अन्य नसे या सृष्टी |
तुज सम रूप दुसरे, परमेष्टी | 
करिता झाला कष्टी |
शशीरस रसरसला ,वदनपुटी | 
दिव्य सुलोचन दृष्टी |
सुवर्ण रत्नांच्या, शिरी मुकुटी | 
लोपती रविशशी कोटी |
गजमुखी तुज स्तविले हेरंबे |
 मंगल सकळारंभे || जय जय || १ ||

कुमकुम चिरी शोभे मळवटी | 
कस्तुरी टिळक लल्लाटी |
नासिक अति सरळ, हनुवटी | 
रुचिरामृत रस ओठी |
समान जणू लवल्या, धनुकोटी | 
आकर्ण लोचन भ्रुकुटी |
शिरी नीट भांगवळी, उफराटी |
 कर्नाटकची घाटी |
भुजंग नीळरंगा, परी शोभे | 
वेणी पाठीवर लोंबे || जय जय || २ ||

कंकणे कनकाची मनगटी | 
दिव्य मुद्या दश बोटी |
बाजूबंद जडे बाहुबटी | 
चर्चुनी केशर उटी | 
सुगंधी पुष्पांचे हार कंठी |
बहु मोत्यांची दाटी | 
अंगी नवी चोळी, जरीकाठी | पीत पितांबर तगटी |
पैंजण पदकमळी, अति शोभे | 
भ्रमर धावती लोभे || जय जय ||३ ||

साक्षप तू क्षितिच्या तळवटी |
 तूचि स्वये जगजेठी |
ओवाळीत आरती, दिपताटी | घेऊनी कर संपुष्टी |
करुणामृत हृदये, संकटी | धावसी भक्तांसाठी |
विष्णूदास सदा, बहुकष्टी | देशील जरी नीजभेटी |
तरी मग काय उणे, या लाभे |
 धाव पाव अविलंबे || जय जय || ४ ||



You May Also Like :


आज आपण या पोस्ट मध्ये रेणुका देवीची आरती बघितले . अश्याच आरती अणि भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुनः भेट नक्की दया .


धन्यवाद !!!!





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.