Header Ads

Navratri Aarti Lyrics In Marathi | नवरात्री देवीची आरती

 

नमस्कार मित्रांनो आज आपन या पोस्ट मध्ये Navratri Aarti Lyrics In Marathi बघणार आहोत . नवरात्र हा नऊ रात्रीचा उत्सव असतो यामध्ये देवी दुर्जेच्या ९ रुपंची ९ दिवस पूजा केलि जाते . हिन्दू नवरात्रीला खुप महत्व आहे . याच नवरात्रिची आरती आज आपन बघणार आहोत .ही आरती खास करूँ नवरात्री मध्ये बोलली जाते .भारतामध्ये है उत्सव चैत्र ,पौष आणि आश्विन या महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असा ४ वेला साजरा करतात .तरीसुद्धा चैत्र महिन्यांमध्ये येणाऱ्या नवरात्रीला विशेष महत्त्व असते . चला वळूया नवरात्री आरती कड़े -


|| नवरात्री देवीची आरती ||



उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||

अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र - जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||

द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो

कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||

चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य​ पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||

षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||

अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||

दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||




हे पण वाचा :


मित्रांनो आज आपण Navratri Aarti Lyrics In Marathi बघितले .अशाच भक्ति सम्बंधित पोस्ट साथी True Marathi Lyrics ला पुनः नक्की भेट दया

धन्यवाद !!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.