सासूबाई कविता मराठी | Sasubai Kavita Marathi
सासू आणि सुनेचे नाते हे प्रेम, आपुलकी, काळजी आणि कधी कधी छोट्या-मोठ्या गैरसमजांनी रंगलेले असते.😕😶 काळानुसार या नात्यातही अनेक सुंदर बदल झाले आहेत.💖💖 सासूबाई म्हणजे कुटुंबाचा आधार, अनुभवाची शिदोरी आणि घराला एकत्र ठेवणारी व्यक्ती. आपल्या भावना सुंदर शब्दांत व्यक्त करण्यासाठी सासूबाईवर अधरीत कविता हा एक उत्तम पर्याय ठरतो. सासूबाईंबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या कविता💛 विविध प्रसंगी शेअर करता येतात. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम किंवा सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा कविता नक्कीच मनाला भावतात.
________________
सासूबाई कविता मराठी
Kavita - 1 माझ्या सासूबाईंना...
तुम्ही माझ्यासाठी केवळ चांगल्या सासूबाई नाही,
तर एक जिवलग मैत्रीण आहात... 🌸
तुम्ही मला फक्त या घरात जागा दिली नाही,
तर इतक्या प्रेमाने स्वीकारलं की
जणू मी या कुटुंबाचाच एक भाग होते. ❤️
आपल्या गप्पा, सहज उमटणारं हसू,
आणि तुम्ही दिलेलं आपलेपण
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहे. ✨
तुमच्या मुलाशी लग्न करून मला
एक सुंदर जोडीदार मिळाला,
पण तुमच्यासारखी प्रेमळ, समजूतदार
आणि मायेची आई मिळाली-
हे माझं खरं भाग्य आहे. ❤️
मनःपूर्वक धन्यवाद, आई!
❖ ❖ ❖ ❖
Kavita - 2 सासू 💞
सासू माझी भासे मला माझ्या आई सारखी
कधी केला ना दुरावा , देते मायेची सावली
करी सर्वांचा विचार , गुण आहेत महान
कधी चूक झाली काही , तरी घेतले समजून
भाग्य लागते भेटाया , आज सासू तुमच्या सारखी
जन्मोन्जन्मी होईन मी सून तुमच्या घरची
सासू सुनेच नातं म्हणजे जणू एकमेकांच्या पाठराखिणी
कितीही तू तू मैं मैं झालं तरी राहतात सहजीवनाच्या
सोबतीने 😍
सासूने आपल्या सुनेचे केलेले
कौतुक हे पुरस्कारापेक्षा कमी नाही
आई तुम्हाला जन्म देते आणि आयुष्य देते ,
सासू तुम्हाला तिचे जीवन देते
रडत या जगात आल्यावर एक आई कुशीत घेते
तर रडत सासरी गेल्यावर एक आई मिठीत घेते
❖ ❖ ❖ ❖
Kavita - 3
परक्याचं धन बोलून लेकीला
बाई शंभर वेळा टोकते
काहीही झालं तरी आपल्या घरची
म्हणत सुनेला नेहमी माफ करते
घरामधली प्रत्येक गोष्ट
बाई लेकीवरच लादते
मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट
तिच्याच कलेने घेते
❖ ❖ ❖ ❖
Kavita - 4 सासूबाई
सासूबाई म्हणजे दुसरी आई,
पण ती ओळख पटायला वेळ लागतो,
तिच्या शब्दांत उपदेश असतो,
तिच्या मनात काळजी दडलेली असते,
फक्त बघणारा नजरेत प्रेम असलं पाहिजे.
सासूबाई
सासूबाई म्हणजे दुसरी आई,
पण ती ओळख पटायला वेळ लागतो,
तिच्या शब्दांत उपदेश असतो,
तिच्या मनात काळजी दडलेली असते,
फक्त बघणारा नजरेत प्रेम असलं पाहिजे.
❖ ❖ ❖ ❖
Kavita - 5
सासूबाईंच्या पदराची 'माया' ❤️🥺
आईच्या पदरानंतर, सासूबाईंचा पदर मिळतो,
नाते जपून पाहिले, तर त्यातही जीव दिसतो!
आईने रागावले तर, आपण मनाला लावत नाही,
सासूबाईंनी रागावले तर, त्यांची माया दिसत
नाही?
अगं, चूक आपली असेल, तर त्यांनी समजवायचे
नाही का?
आईनंतर दुसऱ्या आईने, आपल्याला शिकवायचे
नाही का?
थोडे थकल्यावर म्हणतात, "अगं, बस जरा येऊ,
तब्येत बरी नाही का ग? सांग, काय होतंय तुला
आजकाल?"
माहेरची आठवण येता, डोळ्यांत पाणी येतं,
त्या जवळ घेऊन म्हणतात, "अगं, मी आहे ना,"
मन भरून येतं!
स्वतःच्या मुलापेक्षा, सुनेचा मोठेपणा सांगतात,
चारचौघांत तिची बाजू घेऊन, स्वतः लहान
होतात!
नातवंडे आली की, मुलालाही मागे टाकतात,
सुनेच्या लेकरांवर, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम
करतात!
सासूबाईंना जीव लाव, नवऱ्याचेही मन रमतं,
कारण त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यालाही
सुख देतं!
सगळ्यांनाच नाही मिळत, असा मायेचा पदर,
ज्यांना मिळतो, त्यांनी जपावा... हेच सांगते मी
खरं मनभर...!!
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
________________
सासूबाई आणि सुनेचे नाते💓 अधिक प्रेमळ, जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे बनवण्यासाठी संवाद आणि परस्पर आदर महत्त्वाचा असतो. मनातील भावना शब्दांत मांडल्यामुळे नात्यातील आपुलकी💕 आणखी वाढते. त्यामुळे आपल्या प्रेमळ सासूबाईंसाठी सुंदर सासूबाई कविता शेअर करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य👵 आणता येईल. साधे पण मनापासून लिहिलेले काही शब्दही नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा अधिक घट्ट करू शकतात.💘💘 अशाच सुंदर कवितांमधून सासूबाईंबद्दलचा आदर, माया आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच खास ठरतो.
________________
Post a Comment