-->

Header Ads

मला नाही म्हणायला शिकायचंय कविता | स्पृहा जोशी



🙏🙏🙏नमस्कार मला नाही म्हणायला शिकायचंय कविता बघणार आहोत.

______________



🌻मला नाही म्हणायला शिकायचंय कविता | Marathi🌻

मला 'नाही' म्हणायला शिकायचंय...
आर्जवी शब्दांना,
खेळकर मागण्यांना,
पसरलेल्या अगतिक हातांना,
डोळ्यांतल्या पाण्याला,
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय...

वाऱ्याच्या वेगाला,
झऱ्याच्या नादाला,
पाखरांच्या गाण्याला,
बेधुंद वाटांना,
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय...
आपल्यांच्या मनाला,

मनातल्या आपल्यांना,
खरं बोलू पाहणाऱ्या
आतल्या आवाजाला
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय...

हल्ली हे असंच वागावं लागतं,
त्याशिवाय चालतच नाही.
मी कधीपासून खूप प्रयत्न करतेय
खरं सांगते... जमतच नाही !!!

~ स्पृहा जोशी

✤ ✤ ✤ ✤



🌻मला नाही म्हणायला शिकायचंय कविता | English🌻

Mala 'Nahi' Mhanayla Shikaychay...
Aarjavi ShabdanNa,
Khelkar Magnyanna,
Pasarlela Agatik Hatanna,
Dolyantlya Panyala,
Mala 'Nahi' Mhanayla Shikaychay...

Varyachya Vegala,
Zharyachya Nadala,
Pakharnchya Ganyala,
Bedhund Vatanna,
Mala 'Nahi' Mhanayla Shikaychay...

Aaplyanchya Manala,
Manatlya Aaplyanna,
Khar Bolu Pahanarya
Aatlya Aawazala
Mala 'Nahi' Mhanayla Shikaychay...

Halli He Asanch Vagav Lagat,
Tyashivay Chalatach Nahi.
Mi Kevhapasun Khup Prayatn Karatey
Khar Sangte... Jamatanch Nahi !!!

~ Spruha Joshi

✤ ✤ ✤ ✤ 



✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये मला नाही म्हणायला शिकायचंय कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.