का कुणास ठाऊक मराठी कविता | Ka Kunas Thauk Kavita(Marathi)
नमस्कार, या पोस्टमध्ये तूम्हाला का कुणास ठाऊक मराठी कविता वाचायला मिळेल.
का कुणास ठाऊक मराठी कविता
का कुणास ठाऊक ?
आज क्षणभर थांबावस वाटतं
हरवलं मन
पुन्हा शोधावसं वाटतं
अशांत हे मन
शांत करावसं वाटतं
होऊन अपेक्षा शून्य
चिंतामुक्त व्हावसं वाटतं
थांबवून धडपड सारी
आज स्तब्ध व्हावसं वाटतं
भरल्या पोटी
शांत निजावसं वाटतं
आज जन्म आणि मृत्यू
अंतर विसरावसं वाटतं
का कुणास ठाऊक
आज थोडसं प्रेम
स्वतःवर करावसं वाटतं ....
तर आज आपण या पोस्टमध्ये का कुणास ठाऊक मराठी कविता बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
Post a Comment