-->

Header Ads

शांती उद्याच्या जगाची कविता पद्मा गोळे | Shanti Udyachya Jagachi Kavita



🙏🙏🙏नमस्कार शांती उद्याच्या जगाची कविता बघणार आहोत.

______________


शांती उद्याच्या जगाची कविता | Marathi

शांती उद्याच्या जगाची
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीही महाराष्ट्र कन्या
धर्म जाणते विरांची.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे,
अरे मीही सांगते ना
जीजा लक्ष्मीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना,
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरूप
आठवावे रणांगणी.

धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन.

- पद्मा गोळे

❖ ❖ ❖ ❖



शांती उद्याच्या जगाची कविता | English

Shanti Udyachya Jagachi
Mhanuniya Majhya Dola
Nahi Thembahi Dukhacha;
Mihi Maharashtra Kanya
Dharm Jante Viranchi.

Nahi Ekahi Hundka
Mukhavate Kadhanar,
Mich Lavuni Thevili
Tujhya Talvaris Dhar.

Ashubhachi SavalihI
Nahi Padnar Yethe,
Are Mihi Sangte Na
Jija Lakshmishi Nate.

Tujhya Shastranna, Astranna,
Shakti Deil Bhavani,
Shivrayanche Swaroop
Aathvave Ranangani.

Dhanya Kari Majhi Kus
YeI Vijayi Houn,
Punha Majhiya Hatane
Dudhbhat Bharvin.

— Padma Gole

❖ ❖ ❖ ❖



✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये शांती उद्याच्या जगाची कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.