भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर Lyrics | Bhola Ha Shankar Pudhe Nandishwar
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर Lyrics बघणार आहोत.
___________
🌸भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर Lyrics | Marathi🌸
भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर ।
तेथें मी पामर काय वर्णू ॥ १ ॥
भूषण जयाचें भुवना वेगळे ।
रुंडमाळा खेळे गळ्यामध्यें ॥ २ ॥
कपूरगौर भोळा सांब सदाशिव ।
भूषण धवल विभूतीचे ॥ ३ ॥
माथां जटाभार हातीं तो त्रिशूळ ।
श्वेत शंख बळें फुंकीतसे ॥ ४ ॥
भांग जो सेवूनि सदा नग्न बैसे ।
जटेंतूनिय वारे गंगाजळ ॥ ५ ॥
गोदडी घालूनि स्मशानीं जो राहे ।
पंच वस्त्र होय श्रेष्ठ भाग ॥ ६ ॥
नाम घेतां ज्याचे पाप ताप जाती ।
पापी उद्धरती क्षणमात्रे ॥ ७ ॥
नरहरी सोनार भक्ति प्रियकर ।
पार्वती शंकर हृदयीं ध्यातो ॥ ८ ॥
❖ ❖ ❖ ❖
🌸भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर Lyrics | English🌸
Bhola Ha Shankar Pudhe Nandishwar
Tethe Mi Pamar Kay Varnu || 1 ||
Bhushan Jayache Bhuvana Vegale
Rundmala Khele Galyamadhye || 2 ||
Kapurgaur Bhola Samb Sadashiv
Bhushan Dhaval Vibhutiche || 3 ||
Matha Jatabhar Hatin To Trishul
Shvet Shankh Bale Phunkitase || 4 ||
Bhang Jo Sevuni Sada Nagn Baise
Jatetuniya Vare Gangajal || 5 ||
Godadi Ghaluni Smashani Jo Rahe
Panch Vastr Hoy Shreshtha Bhag || 6 ||
Naam Gheta Jyache Pap Tap Jati
Papi Uddharati Kshanmatre || 7 ||
Narahari Sonar Bhakti Priyakar
Parvati Shankar Hridayin Dhyato || 8 ||
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- शिव शंकरा आज मला भेटा Lyrics
- शंभू शिवाच्या मंदिरी जाता मिळे सुख शांती खरी Lyrics
- शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा अभंग Lyrics
___________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण भोळा हा शंकर पुढें नंदीश्वर Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
____________
Post a Comment