-->

Header Ads

तुझ्या विना कुणी नाही माझं Lyrics | Tujhya Vina Kuni Nahi Majh



नमस्कार या पोस्टमध्ये आपण यल्लमा तुझ्या विना कुणी नाही माझं Lyrics बघणार आहोत.

__________________

🌸यल्लमा तुझ्या विना कुणी नाही माझं Lyrics 🌸

रडत काळीज माझं येते आठवण आज
हे कसं सांगू तुला येल्लू बाय
तुझ्या विना नाही कोणी ग माझं..
अगं कसं सांगू तुला येल्लू बाय
तुझ्या विना नाही कोणी ग माझं..|| धृ ||

हो..नाही केली येल्लू कधी तुझी मी ग चाडी
काय झाला गुन्हा म्हणून नेसवली साडी
गणगोतानी आई मला छळलया रोज गं...
हो कसं सांगू तुला येल्लू बाय
तुझ्या विना नाही कोणी ग माझं..|| १ ||

अगं तुझ्यासाठी येल्लू केलं जीवाचं या रान
संगतीला माझ्या येल्लू राहत नाही कोण
सारं माहेरचं गं नातं स्वार्थ कळालया आज
कसं सांगू तुला येल्लू बाय
तुझ्या विना नाही कोणी ग माझं..|| २ ||

हो हो नाही होणार यल्लू माझा तो गुन्हा
नको नको येल्लू जोगत्याचा जन्म पुन्हा
बबलू भाऊची साथ बापू व्यथा मांडतो आज
कसं सांगू तुला येल्लू बाय
तुझ्या विना नाही कोणी ग माझं..|| ३ ||

__________________



✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण यल्लमा तुझ्या विना कुणी नाही माझं Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents