मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका Lyrics | Malhari Jhulavi Jhula Banu Khelati Jhoka
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका Lyrics बघणार आहोत.
__________________
मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका Lyrics
सारंग्या बागेमध्ये साधुनिया मोका...(*२)
मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका...|| धृ ||
सारंग्या बागेत वाहे वारा मंद मंद
झोका खेळण्यात बानु राणी झाली दंग
येळकोट गजराचा धरला निसर्गान ठेका
मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका...|| १ ||
मानाई लाडकी गंगादेव शिव भोळा
देवाधिदेव पाही झोक्याचा सोहळा
विश्वकर्ता खंडोबा देव पाठीराखा
मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका...|| २ ||
शेष नाग डोलतो डोईवरी नाथा
उडती पाखर गाती मल्हारीची गाथा
गौरी गायत्री मारी मल्हारीला हाका
मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका...|| ३ ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण मल्हारी झुलवी झुला बानू खेळती झोका Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment