जय हनुमान भक्ती गीत Lyrics | Jay Hanuman Bhajan Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण जय हनुमान भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
__________________
🌸जय हनुमान भक्ती गीत Lyrics 🌸
महाबली महारुद्र जाऊ त्याला रे शरण
निवारण्या शनिपिडा धरू हनुमानाचे चरण
महाबली महारुद्र जाऊ त्याला रे शरण
निवारण्या शनिपिडा धरू हनुमानाचे चरण
निवारण्या शनिपिडा धरू हनुमानाचे चरण
जय हनुमान जय हनुमान अंजनी सुता जय हनुमान || धृ ||
हो बालपणी केली लीला झेप गिळण्या सूर्यास
इंद्र करी वज्र घात विघ्न पुढील कार्यास
भवताप भोगुनिया शुद्ध तुझे अंतःकरण
जय हनुमान जय हनुमान अंजनी सुता जय हनुमान || १ ||
दहावी अंगठीची खूण सीतामाईला मारुती
रामवियोगाची आता नको रे आहुती
द्रोणागिरी उचलूनी चुकविले लक्ष्मण मरण
जय हनुमान जय हनुमान अंजनी सुता जय हनुमान || २ ||
ओ रामा भक्त वायु पुत्रा केले सिंदूर अर्पण
माळ सईच्या पानाची भक्ती भावे समर्पण
गदा धारी बजरंगाचे करा म्हणून मनोमनी स्मरण
जय हनुमान जय हनुमान अंजनी सुता जय हनुमान || ३ ||
_________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment