आबा आणि आंबा बालगीत Lyrics | Marathi Baalgeet For Kids
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आबा आणि आंबा बालगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
👴आबा आणि आंबा बालगीत Lyrics 👴
आंब्याचे हे झाड माझ्या आबांनी लावलं
आबांसारखं झाड सुद्धा मोठे मोठे झालं
आंब्याच्या या झाडाचा बुंधा मोठा केवढा !
खूप खूप मजबूत माझ्या आबांएवढा !
आंब्याच्या या झाडाची सावली घनदाट
वाटे माझ्या आबांचा थोपटणारा हात
आंब्याच्या या झाडांची झुलतात कशी पान
आवाज असे डोलतात ऐकताना गाणं
आंब्याच्या झाडाची पसरलेली फांदी
आबा सारखी फिरवते बसून खांद्यावरती
आंब्याच्या झाडाचा मोहर असा फुले
झोपताना आजोबांची गोष्ट जशी खुले
आंब्याच्या झाडाचा गोड गोड आंबा
लाडक्या माझ्या आबांचा जणू गोड पापा..
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- अट्टू आणि गट्टू फिरायला चालले बालगीत Lyrics
- मुंगीबाई मुंगीबाई बालगीत Lyrics
- वटाणा फुटाणा शेंगदाणा कविता
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण आबा आणि आंबा बालगीत Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment