-->

Header Ads

हनुमान जयंती विशेष पाळणा Lyrics | Hanuman Palna Lyrics


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण हनुमान जयंती विशेष पाळणा Lyrics बघणार आहोत.

_________________

हनुमान जयंती विशेष पाळणा Lyrics

पहिल्या दिवशी झाला आनंद
माया अंजनी होती वनात
शिव शिव जय करी मनात
पोटी जन्मले बाळ हनुमंत
जो बाळा जो जो रे जो....

चैत्र महिन्यात पौर्णिमेला
बाळ मारुती आला जन्माला
फळ समजला वरी सूर्याला
जो बाळा जो जो रे जो....

सूर्यधराया मारुती गेला
इंद्र युद्धाशी धावून आला
वज्र मारीला उजव्या कुशीला
इंद्राने मारुती मूर्च्छित केला
जो बाळा जो जो रे जो....

पिता वायू धावूनी आला
बाळ हनुमंत हाती घेतला
एक क्षण वारा बंद तो केला
वर मागून घेतो देवाला
वज्र देह करी बाळ मारुतीला
जो बाळा जो जो रे जो....

अंजनी माता सांगते खूण
बाळा आहे तुला गुप्त कैपीन
जो ओळखले ही तुझी जन्म खूण
जाऊन धरावे त्याचे चरण
जो बाळा जो जो रे जो....

रावणाने सीता पळवली लंकेत
राम रानात शोधू लागला
हनुमंत त्याच्या दृष्टी पडला
जो बाळा जो जो रे जो....

भेटले दोघे राम लक्ष्मण
ओळखली वानराची गुप्त जन्म खूण
मारुतीला झाली आठवण
प्रभू रामचंद्राचे धरिले चरण
जो बाळा जो जो रे जो....

दास हनुमंत लंकेत गेला
सीतामाई होती अशोक वनाला
रामाची मुद्रिका दावी मातेला
सीतामाईच्या चरणी लागला
जो बाळा जो जो रे जो....

मारुती गेला रावण सभेला
शेपटीचे आसन रचू लागला
रावणापेक्षा तो उंच जाहला
जो बाळा जो जो रे जो....

क्रोधाने रावण बोलला
आज्ञा दिली राक्षस सेनेला
मारून टाका या वानराला
जो बाळा जो जो रे जो....

ब्रह्मदेवाने केले टिप्पण
मारुतीने केले लंका दहन
सीतामाईच्या चरणी लागून
रामा हाती दिले ब्रह्म लिखाण
जो बाळा जो जो रे जो....

मारुती जन्माचा पाळणा गाईला
तन-मन-धन लागे चरणाला
राम स्मरता रामराम जपता
झुला झुलवा अंजनी सुता
जो बाळा जो जो रे जो....

_________________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
_________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण हनुमान जयंती विशेष पाळणा Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents