Header Ads

अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला Lyrics | Anjanichya Mandivari Maruti Kasa Jhopala



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला Lyrics बघणार आहोत.

_____________________

🌷अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला Lyrics🌷

निळ्या निळ्या आकाशी बाई ग चंद्र उगवला
अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला.. || धृ ||

हनुमंताचे किती करू सेवा
सेवाही करताना मिळेल मला मेवा
मेवाही खाताना बाई माझ्या कंठ दाटला
अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला.. || 1 ||

बजरंगाची बाई किती करू भक्ती
भक्ती ही करताना मिळेल मला मुक्ती
जन्मभरी देव माझा बाई ग ऊनी तापला
अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला.. || 2 ||

मारुतीरायाच्या किती करू ध्यान
ध्यानही करताना जाईल माझा प्राण
चौदा वर्षे राम माझा बाई ग वनी तपला
अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला.. || 3 ||

राम आणि लक्ष्मण भरत आणि शत्रुघन
चौघे बाळ आहे देवाच्या समान
चौदा वर्ष राम माझा बाई ग वनी राहिला
अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला.. || 4 ||

* * * * *
______________________


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________________

आज या पोस्ट मध्ये आपण अंजनीच्या मांडीवरी मारुती कसा झोपला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.