-->

Header Ads

दारात आला साई म्हणे भिक्षा देग माई Lyrics | Sai Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण दारात आला साई म्हणे भिक्षा देग माई Lyrics बघणार आहोत.


सॉंग - दारात आला साई
लिरिक्स /म्युझिक/ सिंगर - नाना वीर


__________________

🌸दारात आला साई म्हणे भिक्षा देग माई Lyrics 🌸


सांज सकाळच्या पाराला
माझ्या दारात आलाय साई
दारात आला साई
म्हणे भिक्षा दे ग माई
भिक्षां दे ग माई....
भिक्षां दे ग माई.... || धृ ||

घेतो दक्षिणा स्वतः मागून
पूर्ण करतो इच्छा आकांक्षा
ज्याला कसलीच कमी होत नाही
तरी दारोदार मागितो भिक्षा
या हो साईच्या नगरीत
कोणी उपाशी राहत नाही...
या हो बाबाच्या नगरीत
कोणी उपाशी मरत नाही
दारात आला साई
म्हणे भिक्षा दे ग माई
भिक्षां दे ग माई....
भिक्षां दे ग माई.... || १ ||

बाल फकीर होऊन आले
बाबा शिर्डी नगराला
मोठं नशीब या शिर्डीचं
फिकं पडलं स्वर्गाला
धन्य धन्य ती बायजाबाई
जिला बाबांनी मानलं आई
दारात आला साई
म्हणे भिक्षा दे ग माई
भिक्षां दे ग माई....
भिक्षां दे ग माई.... || २ ||

जरी शरीर दिल टाकून
येतो हाकेला रे धावून
सुख मिळेल माझ्या जीवाला
साई बाबाला पाहून
आठवण येत आहो साई बाबांची
नाना रडतो ढाई ढाई
दारात आला साई
म्हणे भिक्षा दे ग माई
भिक्षां दे ग माई....
भिक्षां दे ग माई.... || ३ ||

__________________



✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण दारात आला साई म्हणे भिक्षा देग माई Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents