चांदणी पालखीत आई निघाली Lyrics | Chandani Palkhit Aai Nighali
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चांदणी पालखीत आई निघाली Lyrics बघणार आहोत.
सॉंग - चांदणी पालखीत आई निघाली
लिरिक्स - संतोष जंगम
सिंगर - तृप्ती जाधव
म्युझिक - संदीप पालेकर
__________________
🌸चांदणी पालखीत आई निघाली Lyrics 🌸
सोन्याच्या पावलांनी उंबरा
ओलांडून आली ही घराला
चांदणी पालखीत आई निघाली
शिमगा खेळायला..शिमगा खेळायला.|| धृ ||
या वर्षाच्या सणाला जाऊ वेरळ गावाला
माझ्या जाकमाता आईचे चला दर्शन घ्यायला
फाल्गुन पुनवला वर्षाच्या
सणाला गाव सारा जमला
घराघरातून आली लेकरं
आईच्या सोबतीला....
थाटामाटाने मिरवूया हा
आईचा सोहळा.. माझ्या आईचा सोहळा..
चांदणी पालखीत आई निघाली
शिमगा खेळायला..शिमगा खेळायला.|| १ ||
वाजत गाजत आली
आनंदात वारी जाकमातेची
हळदीन कुंकवाचं मळवट
भरून ओटी ही भरायची
गावाची माऊली भेटाया धावली
लाडक्या लेकराला..
आपल्या लाडक्या लेकराला....
चांदणी पालखीत आई निघाली
शिमगा खेळायला..शिमगा खेळायला.|| २ ||
नदी ओलांडून आलाय
धावून जाळकोबा भेटायला
सत्वर निघाली बांधवा
सवे ही फेरहा धरायला
बहिणी भावाची भेट ही पाहण्या
गाव हा आतुरला...
सारा गाव हा आतुरला...
चांदणी पालखीत आई निघाली
शिमगा खेळायला..शिमगा खेळायला..|| ३||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण चांदणी पालखीत आई निघाली Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment