-->

Header Ads

ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं Lyrics | Jyotiba Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं Lyrics बघणार आहोत.

______________________

🌸ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं Lyrics🌸

|| ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ||

ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं
चरणी लागायचं वरदान मनात मागायचं... || धृ ||

माझा उपास उपास इतवारी
सडा सारवण केलं ग दारी ग दारी
येतो पाहून माझ्या घरी ग घरी
देव ज्योतिबा घोड्यावरी ग वरी
रूप हे देवाचं तेव्हा निरखून बघायचं
चरणी लागायचं वरदान मनात मागायचं... || 1 ||

याच्या डोंगरी पळतो ग नंदी
वाट चालतो भक्त छंदी ग छंदी
पाणी पिण्याला जात्या मंदी ग मंदी
जत्रा कराला बारा खंडी ग खंडी
अशा या डोंगरी आणि रातभर जागायचं
ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं.. || 2 ||

त्याचा नागर तांब्याचा तांब्याचा
हे त्याचा कळस सोन्याचा सोन्याचा
त्या मंदिरी जाण्याचा जाण्याचा
घाट फणस आंब्याचा आंब्याचा
चैती पुनवेला अन चैती पुनवेला
हे चैती पुनवेला त्याच्या जत्रेला निघायचं
ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं.. || 3 ||

ज्योतिबाच्या त्या रूपात रूपात
आला कोल्हापूर भागात भागात
ए दुःख हे विसरूनी तिथं सुखच भोगायचं
ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं
चरणी लागायचं वरदान मनात मागायचं... || 4 ||

* * * * *

______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________


👀आज या पोस्टमध्ये आपण ज्योतिबा देवाचं गुण बाई जनात सांगायचं Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!

______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.