तू देव ज्योतिबा गरिबाचा ईश्वर Lyrics | Jyotiba Bhaktigeet Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण तू देव ज्योतिबा गरिबाचा ईश्वर Lyrics बघणार आहोत.
________________
तू देव ज्योतिबा गरिबाचा ईश्वर Lyrics | Marathi
तू देव ज्योतिबा गरिबाचा ईश्वर
गरिबाचा ईश्वर....
तू ब्रह्मा विष्णू शिवशंकर || धृ ||
तू केदारनाथाचा अवतार
तुझ्या हातामधी सोन्याची तलवार
सुखी भक्ताला ठेवीशी घरोघर
ठेवीशी घरोघर....
तू ब्रह्मा विष्णू शिवशंकर || १ ||
तुला आंबेन दिलया आमंत्रण
तू संकटी आलास धावून
युद्ध करून वधलास रत्नासुर ..
वधलास रत्नासुर ..
तू ब्रह्मा विष्णू शिवशंकर || २ ||
तुरा शोभतो तुझीया फेटावरी
दिसे भरजरी पोशाख अंगावरी
तू पावन केलंस कोल्हापूर...
केलंस कोल्हापूर...
तू ब्रह्मा विष्णू शिवशंकर || ३ ||
तू देव ज्योतिबा गरिबाचा ईश्वर
गरिबाचा ईश्वर....
तू ब्रह्मा विष्णू शिवशंकर ||
******
________________
✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण तू देव ज्योतिबा गरिबाचा ईश्वर Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
________________
Post a Comment