-->

Header Ads

हरी नामाची गोडी लागली भक्तीगीत Lyrics | Hari Namachi Godi Lagli



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये हरी नामाची गोडी लागली भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
___________________

🌸हरी नामाची गोडी लागली भक्तीगीत Lyrics 🌸

हरी नामाची गोडी लागली
भक्ती करताना तहानभूक हरली
हरिनामाची गोडी लागली..|| धृ ||

लाभला हो मला सत्संग
भेट देईल तो पांडुरंग
आनंदाचे हे उठती तरंग
सुख शांती ही जीवनात आली
हरी नामाची गोडी लागली..|| १ ||

सत्संगी केली जोडाजोडी
विठ्ठल नामी अमृताची गोडी
मोहमायेचे बंधन तोडी
पांडुरंगाने किमया केली
हरी नामाची गोडी लागली..|| २ ||

पांडुरंगाची कृपा छाया
भवसागरी मुक्त कराया
सोपाना उद्धारली ही काया
नका माझी ही किनाऱ्याला नेली
हरी नामाची गोडी लागली..|| ३ ||

___________________


✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण हरी नामाची गोडी लागली भक्तीगीत Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents