बोलतो हरी हरी आम्ही वारकरी Lyrics | Bolato Hari Hari Amhi Varkari
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये बोलतो हरी हरी आम्ही वारकरी Lyrics बघणार आहोत.
_________________
बोलतो हरी हरी आम्ही वारकरी Lyrics | Marathi
देवा पांडुरंगा धाव घे प्रसंगा
पंढरीच्या तू नाथा
बोलतो हरी हरी आम्ही वारकरी
चरणी नमवितो माथा...|| धृ ||
आली भक्तावर कठीण वेळ
कोणा कळेना दैवाचा खेळ
कुठे लागेना सत्याचा मेळ
असत्याची झालीया भेळ
सारे जाणूनी यावे धावूनी
अनाथाच्या तू नाथा....
बोलतो हरी हरी आम्ही वारकरी
चरणी नमवितो माथा...|| १ ||
गळा घालून तूळशी माळ
नाम जपतो सांज सकाळ
केले बुटक्याने काळे कपाळ
थकलो वाजवूनी ते टाळ
द्यावे दर्शन करा रक्षण
आमचा तू भाग्यविधाता....
बोलतो हरी हरी आम्ही वारकरी
चरणी नमवितो माथा...|| २ ||
मार्ग भक्तीचा आम्हा कळू दे
साऱ्या भक्तांचे विघ्न टळू दे
भक्ती मार्गाने जग हे वळू दे
तुझे दर्शन आम्हाला मिळू दे
कविनंदही प्रेमानंद ही गातोया गौरव गाथा
बोलतो हरी हरी आम्ही वारकरी
चरणी नमवितो माथा...|| ३ ||
* * * * *
_________________
✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
- देवा येतो मी पंढरीला Lyrics
- पंढरीचा वारकरी पायी पायी चालतो Lyrics
- पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला गीत
_________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण बोलतो हरी हरी आम्ही वारकरी Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________
Post a Comment