डोंगर माथ्याला ज्योतिबा भक्तीगीत Lyrics | Jyotiba Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण डोंगर माथ्याला ज्योतिबा भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌷डोंगर माथ्याला ज्योतिबा भक्तीगीत Lyrics 🌷
डोंगर माथ्याला ज्योतिबा
डोंगर माथ्याला...
खारीक खोबरं गुलाल
दवणा आवड देवाला
डोंगर माथ्याला ज्योतिबा
डोंगर माथ्याला... || धृ ||
चैत्र पुनवला गर्दी जत्रला
ज्योतिबा डोंगर गजबजलाय
भक्तांची वारी ज्योतिबा तारी
छबिना ज्योतिबा सजलाय
सासनकाठी मानाची निघतय
यमाई भेटीला...
डोंगर माथ्याला ज्योतिबा
डोंगर माथ्याला...|| १ ||
काळ्या पथराची स्वयंभू मूर्ती
ज्योतिबा सिंहासनी बसलाय
त्रिशूळ डमरू थडगा हाती
शिव शंकराच रूप धरलय
वाहन घोडा पायात तोडा
तोऱ्यात निघालाय....
डोंगर माथ्याला ज्योतिबा
डोंगर माथ्याला...|| २ ||
हाकेला धावणारा नवसाला पावणारा
पाठीशी उभा हाय ज्योतिबा
उराशी धरतो सांभाळ करतो
भक्तांचा कैवारी ज्योतिबा
सांज सकाळी भर दुपारी
जाऊया आरतीला....
डोंगर माथ्याला ज्योतिबा
डोंगर माथ्याला...|| ३ ||
खारीक खोबरं गुलाल
दवणा आवड देवाला
डोंगर माथ्याला ज्योतिबा
डोंगर माथ्याला... ||
_______________________
✅ही भक्तिगीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________________
तर आज या पोस्ट यामध्ये आपण डोंगर माथ्याला ज्योतिबा भक्तीगीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
_________________________
Post a Comment