Header Ads

महादेवाच्या पिंडीवर भक्ती गीत Lyrics | Chandan Kambale | Mahadevachya Pindivar



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.


सॉंग महादेवाच्या पिंडीवर
लिरिक्स - म्युझिक चंदन कांबळे
म्युझिक - अभी - ओम
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड

___________________

महादेवाच्या पिंडीवर भक्ती गीत Lyrics

मस्तकी चांदोबा गळ्यामधी नागोबा..(*२)
महादेवाचे रूप पाहिलं या पिंडीवर..
बेल दवणा दूध वाहीलं...
त्या पिंडीवर... बेल दवणा दूध वाहिलं...

हर हर महादेव..(*४)
महादेव...

शिव हर मुखी म्हणता पळतो या काळ...
भाळावर भस्म लेता मिळतंय बळ..
शिव हर मुखी म्हणता पळतो या काळ...
भाळावर भस्म लेता मिळतंय बळ..

भाळावर भस्म लेता मिळतंय बळ..
दिव्य रूप पाहून नतमस्तक होऊन...
दिव्य रूप पाहून नतमस्तक होऊन...
शिव हर मुखी गाईलं
त्या पिंडीवर... बेल दवणा दूध वाहिलं...(*२)
हर हर महादेव..(*४)

शिवशक्ती ब्रह्मानंदी रमलाया मन
पूजत्याती महादेवा सारे देव गन
पूजत्याती महादेवा सारे देव गन

भक्तांचा तारक त्याला सारी पारख
भक्तांचा तारक त्याला सारी पारख
सदा संगतीला राहील...
त्या पिंडीवर... बेल दवणा दूध वाहिलं...(*२)
हर हर महादेव..(*४)

ओमकार जप ज्याचा होई अहोरात्र..
सफलच होई त्याची महाशिवरात्र..

सफलच होई त्याची महाशिवरात्र..
भांग धतुरा कैफान गुंगी मधी बेभान
चंदनात शिव सामील
त्या पिंडीवर... बेल दवणा दूध वाहिलं...(*२)
हर हर महादेव..(*४)

___________________

✅हि भक्तिगीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर भक्ती गीत Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.