Header Ads

बाळाची आंघोळ बालगीत Lyrics💜💜Balachi Anghol Baalgeet



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण बाळाची आंघोळ बालगीत Lyrics बघणार आहोत.

______________

👶बाळाची आंघोळ बालगीत Lyrics 👶


चिऊताई चिऊताई..🐥🐥
काय बरं करतेस ?
छोट्या माझ्या बाळाला..
आंघोळ मी घालते...

मनीमाऊ मनीमाऊ..🐱🐱
काय बरं करतेस ?
छोट्या माझ्या बाळाला..
आंघोळ मी घालते...

हम्मा ग हम्मा...🐮🐮
काय बरं करतेस ?
छोट्या माझ्या बाळाला..
आंघोळ मी घालते...

आई ग आई...👩
काय बरं करतेस ?
छोट्या माझ्या बाळाला..
आंघोळ मी घालते...

बोबड्या गालांना लावू थोडासा साबण
इवलेसे हात पायही स्वच्छ करू आपण..

पाऊस पाण्याचा शंभो डोक्यावरती..
बुडबुड पाण्यामध्ये गंमत मस्ती..

अलगद पुसूया अंग मऊ मऊ...
नेटके कपडे घालून तयार होऊ..

पावडर तिट लावू अन तेल फनी करू..
आंघोळ होता पिल्लांचा खेळ पुन्हा सुरू
खेळ पुन्हा सुरू...

******

______________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

_______________

👀आज या पोस्ट मध्ये आपण बाळाची आंघोळ बालगीत Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.