Header Ads

घोर अरण्यात शांत आश्रम Lyrics 💛💛 Datta Bhajan Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण घोर अरण्यात शांत आश्रम Lyrics बघणार आहोत.

____________________

🌸घोर अरण्यात शांत आश्रम Lyrics 🌸

घोर अरण्यात शांत आश्रम
अत्री ऋषींचे घर
तिथे नांदते सती अनुसया पतिव्रता थोर
पण स्वर्गात चर्चा झाली..
सतीची कीर्ती महान...
परीक्षा घेण्या तिची निघाले स्वतः भगवान..

नारद मुनींनी लावली कळी तिन्ही लोकात
झाली गडबड.. 
ब्रम्हा विष्णू निघाले सोडून आपले गड..
साधूचे रूप घेतले.. हातात कमांडलू घेतले..
अलख निरंजन म्हणत दारात येऊन ठेपले..
आवाज दिला मातेला माता भिक्षा दे...

अनुसया आली दारी...
हातात अन्नाचा ताट..
पण साधू रुपी देवांच्या
मनात वेगळाच घाट..
म्हणती अन्न नको असे
आमची अट ही खास

विवस्त्र होऊन वाढावे
तरच घेऊन घास...
संकट पडले भारी...
आता काय करील माऊली
सतीचे तेज जागले
तिथे भीती नाही उरली ...
स्मरण केले अत्रींचे
हातात घेतले पाणी...
त्या पाण्यानेच बदलली देवाची कहाणी...
दिगंबरा.. दिगंबरा..
श्रीपाद वल्लभ दिगंबरा

ती म्हणाली पाप नाही म्हणत तर कशाला लाजू?
माझ्यासाठी तुम्ही बाळ मी तुमची आई होऊ
शिंपडले पाणी अंगावर...
मंत्र विचारला मुखात.. क्षणात चमत्कार झाला..
त्या ऋषींच्या वनात....
दाढी मिशा गायब झाल्या‌.. मोठे रुपही गेले ...
तिन्ही देवांचे तिथे तान्हुले बाळ झाले...

खुळ खुळ वाजतो खुळखुळा...
पाण्यात झोपला ब्रह्मा विष्णू भोळा..
भुकेने रडू लागले ..
तिन्ही जीव इवले... 
अनुसयाने प्रेमाने त्यांना छातीशी लावले...
जो जो रे जो जो... बाळा
जो जो रे जो जो...

इकडे स्वर्गात रडते लक्ष्मी, सरस्वती, पार्वती...
पतींना शोधत आल्या त्या आश्रमाच्या वरती
पाहिले दृश्य आणि जोडीले त्यांनी हात....
चूक झाली आमची माती सोडा आमचे नाथ..
मातेने दया केली.. मूळ रूप दिले परत...
पण देवांनी ठेवले तिथे आपले एक अंशावत..
तीन शिरे सहा हात दत्त रूप साजिरे
अनुसया च्या पोटी आले त्रिमूर्ती हे गोजिरे...
आज आनंद झाला भारी... माझे सनई चौघडा ‌‌

दत्त जयंतीचा पहा उधळलाय गुलाल
खडा नाचूया जाऊया दत्त भजनात रंगूया...
झेंडा रोऊ भक्तीचा गाणगापुरी जाऊया..

दिगंबरा.. दिगंबरा..
श्रीपाद वल्लभ दिगंबरा

|| श्री गुरुदेव दत्त ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

* * * * * *
____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

____________________

👀आज या पोस्टमध्ये आपण घोर अरण्यात शांत आश्रम Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.