Header Ads

असा माझा बाबा बालगीत Lyrics | Asa Majha Baba Baalgeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण असा माझा बाबा बालगीत Lyrics बघणार आहोत.

____________________

👨असा माझा बाबा बालगीत Lyrics 👨

डोंगराएवढा मोठाला वाटतो माझा बाबा..
सुपरमॅन सारखा ताकदवान माझा बाबा..

झुरळ पाल काळोख कशालाच घाबरत नाही बाबा...
बरं नसेल मला तर मात्र कसा घाबरतो बाबा..

लॅपटॉप हेडफोन घेऊन सारखा काम करतो बाबा..
पण माझ्याशी रोज थोडा वेळ नक्की खेळतो बाबा...

गाडीवरून मस्त फिरवून आणतो माझा बाबा..
स्वयंपाक घरात कधी भन्नाट प्रयोग करतो बाबा...

माझं काही चुकलं तर रागावतो सुद्धा बाबा..
नंतर स्वतःच कुशीत घेऊन हळूच समजावतो बाबा..

प्रेमळ, शूरवीर, मिश्किल, हळवा माझा बाबा..
तो सोबत असल्यावर आपण निवांत असतो बाबा....

* * * * * *
__________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

____________________


👀आज या पोस्टमध्ये आपण असा माझा बाबा बालगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!

____________________





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.