Header Ads

पंढरीची जो वारी करी भगवंत नांदतो त्याचे घरी Lyrics | Pandharichi Jo Vari Kari Bhagavant


नमस्कार या पोस्टमध्ये आपण पंढरीची जो वारी करी भगवंत नांदतो त्याचे घरी Lyrics बघणार आहोत.
________________________

🌹पंढरीची जो वारी करी भगवंत नांदतो त्याचे घरी Lyrics 🌹

पंढरीची जो वारी करी
भगवंत नांदतो त्याचे घरी || धृ ||

सावत्या माळ्याचा झाला राखणदार |
दामाजी साठी झाला विठू महार ||
एकनाथा घरी देव पाणी भरी |
भगवंत नांदतो त्याचे घरी || १ ||

जोपवाच्या शिवारात ढोरे वळी |
जनी संग पांडुरंग दळण दळी ||
ओव्या गाईल्या जात्यावरी |
भगवंत नांदतो त्याचे घरी || २ ||

माती गंध टिळा घालून तुळशीची माळ |
मुखी हरिनाम हाती घेऊन विणा टाळ ||
आपलासा ज्याने केला हरी |
भगवंत नांदतो त्याचे घरी || ३ ||

एक वेळ पंढरीला जाऊन या |
विठ्ठलाचा महिमा पाहून या ||
एवढे करा आयुष्यात एकदा तरी |
भगवंत नांदतो त्याचे घरी || ४ ||

*******

___________________


✅ही गीते पण नक्की वाचा 👇👇👇
___________________


👀आज या पोस्टमध्ये आपण पंढरीची जो वारी करी भगवंत नांदतो त्याचे घरी Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.