Header Ads

नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची गवळण Lyrics | Nesali Ga Bai Chandrakala Thipkyachi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची गवळण Lyrics बघणार आहोत.

__________________________

नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची गवळण Lyrics

नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची
तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची || धृ ||

शीळ घालून करतो गोळा चौगड्याचा मेळा
प्रत्येकीला अडवितो मिठी मारी आमच्या गळा
शर्थ झाली बाई याच्या निर्लज्जपणाची
तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची || १ ||

यमुनेच्या पाण्यात जाता उभा पाठोपाठ
लाज लज्जा सोडूनीया कृष्ण कसा धीट
सोड माझी वाट कान्हा ना र मी र परक्याची
तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची || २ ||

काय करू बाई याला काही न कळे
करू लागला बाई भलतेच चाळे..
फिटली ग माझ्या शंका मनाची
तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची || ३ ||

एका जनार्दनी गवळण हसली
हरी चरणाशी मिठी तिने मारली
फिटली ग हौस बाई माझीया मनाची
तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची || ४ ||

* * * * * * *
________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
___________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची गवळण Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

___________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.