Header Ads

देवा बसाना जरा तरी Lyrics | Deva Basa Na Jara Tari



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण देवा बसाना जरा तरी Lyrics बघणार आहोत.

__________________

देवा बसाना जरा तरी Lyrics | Marathi


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
पांडुरंगा तू विटेवरी..
देवा बसा ना जरा तरी.. || धृ ||

लाडक्या भक्ताला भेटण्यासाठी
पुंडलिकाच्या घरी तू गेला
माय पित्याची सेवा करताना
विटेवरी त्याने उभा तुला केला
वर्षे किती झाली पाय दुखतील तुझे हरी
देवा बसा ना जरा तरी.. || १ ||

भक्तांच्या रक्षणा जगाच्या कल्याणा
देहाला किती यातना देशील
अजून किती काळ उभा राहुनी
भगवंता तू किती कष्ट हे घेशील
तुझ्यामुळे उभी रुक्मिणी माता
थकली असेल घरी..
देवा बसा ना जरा तरी.. || २ ||

ज्ञानोबा तुकाराम नामा जनीचा
हट्ट पुरविला पंढरीनाथा
असा एक हट्ट पुरव तू आमचा
विनवितो चरणी ठेवूनी माथा
विटेवरून ये खाली हात जोडीतो वारकरी
देवा बसा ना जरा तरी.. || ३ ||

* * * * * * *
_____________________


✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
_________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण देवा बसाना जरा तरी Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!

_________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.