मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा Lyrics | Marun Ghodyala Tach Nighala Shivba
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा Lyrics बघणार आहोत.
मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा Lyrics |Marathi
मारून घोड्याला टाच निघाला
शिवबा माझा राजा...(*२)
महाराष्ट्राची माय भूमी ही
सांगे रुबाब त्याचा..
मारून घोड्याला टाच निघाला
शिवबा माझा राजा...|| धृ ||
एक होता जिजामातेचा हा
उद्धार केला माय भवानीचा
वाली बनुन असा रयतेचा
विडा उचलला त्याने मानाचा
रणी मैदानी झुंज देऊनी
राजा झाला हिंदुत्वाचा...
मारून घोड्याला टाच निघाला...|| १ ||
शिव शिवाजी लावून प्राण
एक एक मावळा गेला घडून
टाकली मुघल शाही हटवून
ठेवला इतिहास रे घडवून
राजा नव्हे तो दैवत आपूला
अवतार शिव शंभूचा...
मारून घोड्याला टाच निघाला...|| २ ||
आठवा शिवप्रतापाच ज्ञान
शक्ती पेक्षा युक्ती ही महान
औरंगजेबाला दाखवलं ज्ञान
सुटका आग्र्याहून अशी करून
कहा गया हो बोलीत बसला
हलविला पायबळ त्याचा
मारून घोड्याला टाच निघाला...|| ३ ||
महाराष्ट्राची माय भूमी ही
सांगे रुबाब त्याचा..(*२)
मारून घोड्याला टाच निघाला
शिवबा माझा राजा...(*४)
* * * * *
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment