भगवा रोवला अटकेपार Lyrics | Bhagava Rovala Atakepar
नमस्कार या पोस्टमध्ये आपण भगवा रोवला अटकेपार Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.
भगवा रोवला अटकेपार Lyrics | Marathi
शिवरायांचा मावळ खरं
तळपली होती तलवार
अहो मराठा लय झुंजार
मर्द मराठा लय झुंजार
न भगवा रोवला अटकेपार
शिवरायांचं स्वप्न सार
केलं मावळ्यांनी साकार
सारं दक्षिण ते
जिंकून बांधलं विश्वेश्वर मंदिर
सीमा असल्या तलवारीन
स्वराज्य वाढला चहुबाजून
गाजे पराक्रम जगभर
जय भवानी जय शिवाजी
गाजे पराक्रम जगभर
न भगवा रोवला अटकेपार .. || १ ||
किती केले हो धर्मांतर
किती किती हो अत्याचार
तोडली हिंदूंची मंदिर
बहु कापले हिंदू शिर
धर्म रक्षणा पेटून उठले
यवनांना ते कापित सुटले
दिला लढा तो निरंतर
न भगवा रोवला अटकेपार .. || २ ||
मर्द मराठ्यांचा उपकार
चांगलं समजत हिंदूवर
केलं यवनांचा संहार
कीर्ती पसरली दूरवर..
दिल्लीचे तख्त राखीले
सिंधूचे पाणी प्याले
आम्ही मराठा लय कणखर
जय भवानी जय शिवाजी
आम्ही मराठा लय कणखर ..
न भगवा रोवला अटकेपार .. || ३ ||
* * * * *
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇
- मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा
- उगवला तारा तिमिर हरा Lyrics
- जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला
आज या पोस्टमध्ये भगवा रोवला अटकेपार Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment