Bhandaryat Hira Chamakala Lyrics In Marathi | भंडाऱ्यात हिरा चमकला
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Bhandaryat Hira Chamakala Lyrics In Marathi बघणार आहोत.
Bhandaryat Hira Chamakala Lyrics | Marathi
पुण्याच्या शेजारी देवाची जेजुरी
देव ग मल्हारी बसला घोड्यावरी
पाहता चंद्र मनात दचकला
अन भंडाऱ्यात हिरा चमकला..
हिरा चमकला...
भंडाऱ्यात हिरा चमकला.. || धृ ||
खंडेरायाची माझ्या र लीला न्यारी
घोंगडी खांद्याला घेऊन मागे मारी
त्याच्या हाती सुखदुःखाची दोरी..
पडता संकट भक्तांना तोच तारी..
बानुचा भ्रतार भोळा ग मल्हार ग...
घेता दर्शन भक्त हरपला..
अन् भंडाऱ्यात हिरा चमकला.. || १ ||
हाक देता र धावतोया घोड्यावरी
आशीर्वाद तो देतोया शिव भंडारी
भूरळ पाडती र मनाला ही मूर्ती साजिरी
दुःख पळतात चढताच गड जेजुरी ..
तूच अंतर्यामी खरा विश्व स्वामी...
चरणी देवाच्या देह टाकला...
अन् भंडाऱ्यात हिरा चमकला.. || २ ||
असता पाठीशी भीती नाही कसली जीवाला
कपटी वैरीही घाबरतो तुझ्या नावाला
आदराने हा झूकवितो रंक रावाला
हिरा नांदतो पवित्र जेजुरी गावाला ..
गुणात गुणवान मोठा कीर्तीवान ..
त्याच्या कीर्तीने स्वर्ग झाकला..
अन् भंडाऱ्यात हिरा चमकला.. || ३ ||
पुण्याच्या शेजारी देवाची जेजुरी
देव ग मल्हारी बसला घोड्यावरी
पाहता चंद्र मनात दचकला
अन भंडाऱ्यात हिरा चमकला..
हिरा चमकला...
भंडाऱ्यात हिरा चमकला.. ||
* * * * *
आज या पोस्टमध्ये आपण Bhandaryat Hira Chamakala Lyrics In Marathi बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
Post a Comment