Header Ads

झाल्या तिनी सांजा Lyrics | Jhalya Tinhi Sanja Song Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण झाल्या तिनी सांजा Lyrics बघणार आहोत.


सॉंग - झाल्या तिन्ही सांजा
सिंगर - उषा मंगेशकर
लिरिक्स - दादा कोंडके
म्युझिक - राम - लक्ष्मण
लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड


झाल्या तिनी साजा Lyrics | Marathi

झाल्या तिनी सांजा
करुनी शिनगार साजा ...
वाट पाहते मी ग
येणार साजन माझा...

झाल्या तिनी सांजा
करुनी शिनगार साजा ...
वाट पाहते मी ग
येणार साजन माझा...

प्रीतीच्या दरबारीत येणार सरदार..
मायेच्या मिठीत त्यांच्या गळ्यात
घालीन हार...

प्रीतीच्या दरबारीत येणार सरदार..
मायेच्या मिठीत त्यांच्या गळ्यात
घालीन हार...

दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा
वाट पाहते मी तर येणार साजन माझा

भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार
भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार

तान्हेल्या हरीणीला हळूच पाणी पाजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा

त्याच्याच ओठाचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
त्याच्याच ओठाचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल

धुंद व्हावे राणी रंगून जावा राजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा

वाटतं सख्या चं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
वाटतं सख्या चं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल

घालू कशी मी साधं होईल गाजा वाजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा

ईचारच पडला बिचाऱ्या मनाला
येळ का ग व्हावा बाई सख्या सजनाला
ईचारच पडला बिचाऱ्या मनाला
येळ का ग व्हावा बाई सख्या सजनाला

बिलकुल बसावी शंभूला सारजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा

झाल्या तिनी सांजा
करुनी शिनगार साजा ...
वाट पाहते मी ग
येणार साजन माझा...

* * * * *


हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण झाल्या तिनी सांजा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.