Header Ads

Dhagala Lagli Kala Lyrics | ढगाला लागली कळं | दादा कोंडके


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Dhagala Lagli Kala Lyricsबघणार आहोत . चला तर मग बघूया " ढगाला लागली कळं " या गाण्याचे बोल -

सॉन्ग - ढगाला लागली कळं
मुव्ही - बोट लावीन तीथे गुदगुल्या
सिंगर - जयवंत कुलकर्णी , उषा मंगेशकर
म्युझिक - दादा कोंडके


Dhagala Lagli Kala Lyrics | Marathi

जसा जीवात जीव घुटमळं
तसं पीरतीचं वाढतंय बळं
तुझ्या तोंडाला तोंडं माझं मिळं
अग अन हे बघून दुश्मन जळं

वरं ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं

ढगाला लागली कळं....
पाणी थेंब थेंब गळं....
वरं ढगाला लागली कळं....
पाणी थेंब थेंब गळं.....

चल गं राणी...गाऊया गाणी...
फिरुया पाखरासंग
रामाच्या पाऱ्यात...गारगार वाऱ्यात...
अंगाला भिडूदे अंग...
जेंव्हा तुझं नी माझं जुळं...
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं...

सुंदर मुखडा...सोन्याचा तुकडा...
कुठं हा घेऊन जावा...
काय बाई आक्रीत...झालया ईपरीत... 
सश्याला बीळ कुणी दावा ...
माझ्या पदरांत पडलंय खुळं....
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं.....

जमीन आपली...उन्हानं तापली...
लाललाल झालीया माती...
करूया कामं...अन गाळुया घाम...
चला पिकवू माणिक मोती...
एका वर्षात होईल तीळं....
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....

शिवार फुलतंय...तोऱ्यात डुलतयं...
झोक्यांत नाचतोय धोतरा...
तुरीच्या शेंगा...डोलत्यात ठेंगा ...
लपलाय भुईमुंग भित्रा...
मधी वाटाणा बघ वळवळं....
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....

झाडावरं बुलबुल...बोलत्यात गुलगुल...
वराती या कोकिळा...
चिमणी झुरते उगीच...
राघू मैनेवरती खुळा...
मोरं लांडोरीं संग खेळं....
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....

थुईथुई नाचते...खूषीत हसते...
मनांत फुलपाखरू...
सोडा की राया...नाजूक काया...
नका गुदगुल्या करू...
तू दमयंती मी नळं....
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....

बामणाच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत...
येशील का संध्याकाळी...
जाऊ दुसरीकडं...नको बाबा तिकडं...
बसलाय संतू माळी...
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं....
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....

आलोया फर्मात...पडलोया पेरमात...
सांग मी दिसतोय कसा...
सांगू...अडाणी ठोकळा...मनाचा मोकळा...
पांडू हवालदार जसा...
तुझ्या वाचून जीव तळमळं....
पाणी थेंब थेंब गळं
ढगाला लागली कळं....पाणी थेंब थेंब गळं....

⸙ ⸙ ⸙ ⸙



हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Dhagala Lagli Kala Lyrics बघितले. मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद 
🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.