Header Ads

Pandurangacha Palna Marathi | पांडुरंगाचा पाळणा



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Pandurangacha Palna Marathi मधून बघणार आहोत.

Pandurangacha Palna Marathi

पहिल्या दिवशी आनंद झाला |
टाळ मृदंगाचा गजर केला ||
चंदन बुक्क्याचा सुवास त्याला |
पंढरपुरात रहिवास केला ||
जो बाळा जो || १ ||

दुसऱ्या दिवशी करूनी आरती |
दिंड्या पताका वैष्णव नाचती ||
वरती बसविला लक्ष्मीचा पती |
जो बाळा जो || २ ||

तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया |
नव्हती खुलली बाळाची छाया ||
आरती ओवाळू जय प्रभुराया |
जो बाळा जो || ३ ||

चौथ्या दिवशी चंद्राची छाया |
पृथ्वी रक्षण तव कराया ||
चंद्र सूर्याची बाळावर छाया |
जो बाळा जो || ४ ||

पाचव्या दिवशी पाचवा रंग |
लावणी मृदंग आणि सारंग |
संत तुकाराम गाती अभंग |
जो बाळा जो || ५ ||

सहाव्या दिवशी सहावा विलास |
बिलवर हंड्या महाली रहिवास ||
संत नाचती गल्लोगल्लीस |
जो बाळा जो || ६ ||

सातव्या दिवशी सात बहिणी |
एकमेकींचा हात धरुनी ||
विनंती करिती हात जोडूनी |
जो बाळा जो || ७ ||

आठव्या दिवशी आठवा रंग |
गोप गवळणी झाल्या दंग||
वाजवी मुरली उडवीसी रंग |
जो बाळा जो || ८ ||

नवव्या दिवशी घंटा वाजला |
नवखंडातील लोक भेटीला ||
युगे अठ्ठावीस उभा राहिला |
जो बाळा जो || ९ ||

दहाव्या दिवशी दहावीचा थाट |
रंगीत फरशा टाकल्या दाट ||
महाद्वारातून काढली वाट |
जो बाळा जो || १० ||

अकराव्या दिवशी आकार केला |
सोन्याचा कळस शोभे शिखराला ||
रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला |
जो बाळा जो || ११ ||

पाराव्या दिवशी बारावी केली |
चंद्रभागेत शोभा ही आली ||
नामदेव ते बसले पायरीला |
चोकोबा संत महाद्वाराला ||
जो बाळा जो || १२ ||

☘ ☘ ☘ ☘




हे पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Pandurangacha Palna Marathi मधून बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट दयायला विसरू नका.

पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.