Krishnacha Palna Lyrics Marathi | कृष्णाचा पाळणा
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Krishnacha Palna Lyrics Marathi मधून बघणार आहोत.
Krishnacha Palna Lyrics Marathi
मथुरे मध्ये अवतार धरिला |
कृष्ण देवकीच्या गर्भासी आला |||
तोडून बेड्या बंद सोडीला |
चरणांच्या प्रतापे मार्ग दाविला ||
जो बाळा जो || १ ||
गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला |
नंदाच्या घरी आनंद झाला ||
गुढ्या तोरणे शिखरी बांधिती |
कुसुमांचे हार देव वर्षती ||
जो बाळा जो || २ ||
तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री |
तासे नौबती उत्सव करिती ||
सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द |
त्याच्या छंदाने नाचे गोविंद ||
जो बाळा जो || ३ ||
चौथ्या दिवशी चौकी |
बाळंतिणीची न्हाणी होती ||
निंबे डाळिंबे नारळ आणिती |
सख्या मिळोणी दूष्ट काढिती ||
जो बाळा जो || ४ ||
पाचव्या दिवशी पाटा पूजन |
बांधिला फुलवरा वाक्या तोरण ||
सरी बिंदली आंगडे पैरण |
खिरी भरल्या ताटे ठेवली वाढून ||
जो बाळा जो || ५ ||
सहाव्या दिवशी सटवी पूजन |
हळदी कुंकवाची देताती वान ||
एकमेकींसी सख्या होऊन |
पानसुपाऱ्या खोबरे वाटून ||
जो बाळा जो || ६ ||
सातव्या दिवशी सटवीचा फेरा |
गोपा बाळंतीण आवरून धरा ||
सांजच्या प्रहरी अंगारा करा |
गाई वासरा मुला लेकरा ||
जो बाळा जो || ७ ||
आठव्या दिवशी आठवी चौकी |
गोपाळ बाळंतीण नवतीस न्हाती||
सख्या मिळोणी जागरण करिती |
कृष्णाच्या लीला आनंदे गाती |
जो बाळा जो || ८ ||
नवव्या दिवशी नवस केला |
खेळणे वाहिन तुजला ||
रत्नचरित पालख सजला |
वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला ||
जो बाळा जो || ९ ||
दहाव्या दिवशी दहावी चौकी |
न्हाणी बोळवून सारवल्या भिंती ||
मूठ भरल्या ओट्या दिधल्या लावूनी |
देव स्वर्गीचे पुष्पे वर्षूनी ||
जो बाळा जो || १० ||
अकराव्या दिवशी अकरावी चौकी |
यशोदा बसली मंचकावरती ||
नयनाच्या कोरी काजळ भरी |
वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी ||
जो बाळा जो || ११ ||
बारावी दिवशी बारसे येती |
परोपरी पक्कान्ने समये करिती ||
लाडू मोदक पंखा वारीती |
खीर भरल्या वाट्या साखर मिळविती ||
जो बाळा जो || १२ ||
तेराव्या दिवशी तेरावी चौकी |
बारीक जुने नेसूनी येती ||
मोर गरजती चौखडा वरती|
गाई वासरे मोदे हंबरती ||
जो बाळा जो || १३ ||
चौदाव्या दिवशी चौदावी चौकी |
नंदी महादेव परतुनी येती ||
बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती |
गोपांचे मीठ बळीराम घेती ||
जो बाळा जो || १४ ||
पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी |
नगरीच्या नारी मिळूनी येती ||
पाळण्यामध्ये देव मुरारी |
नाव ठेवले श्री कृष्ण हरी ||
जो बाळा जो || १५ ||
सोळाव्या दिवशी सोहळा केला |
गोपी गवळणी कृष्ण अळविला ||
त्यांच्या हृदयी आनंद झाला |
एका जनार्दनी पाळणा गाईला ||
जो बाळा जो || १६ ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण Krishnacha Palna Lyrics Marathi मधून बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट दयायला विसरू नका.
पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment