मराठी कविता धरतीची आम्ही लेकरं (इयत्ता चौथी ) | Dharatichi Amhi Lekar Kavita Iyatta Chouthi
आज या पोस्ट मधून आपण धरतीची आम्ही लेकरं ही मराठी कविता बघणार आहोत. इयत्ता चौथीच्या बालभारती मराठीच्या पुस्तकात ही कविता अभ्यासाला द. ना. गव्हाणकर हे या कवितेचे कवी आहेत. चला तर मग बघूया धरतीची आम्ही लेकर ही कविता -
धरतीची आम्ही लेकरं कविता | Marathi
धरतीची आम्ही लेकरं | भाग्यवान |
धरतीची आम्ही लेकरं || धृ ||
शेतावर जाऊया | सांगाती गाऊया |
राणी वाणी गाती जशी रानपाखरं || १ ||
मेहनत जिमनीवरी | केली वरीसभरी |
आज आलं फळ त्याचं डूले शिवार || २ ||
शाळू, जोंधळा मोती | चमचम चमकत्याती |
मोत्यांची साल भर खाऊ भाकर || ३ ||
स्थापू समानता, पोलादी ऐक्यता |
नाही धनी येथे कुणी नाही चाकर || ४ ||
धरतीची आम्ही लेकरं | भाग्यवान
धरतीची आम्ही लेकरं || धृ ||
- द. ना. गव्हाणकर
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- वल्हवा रं वल्हवा कविता पाचवी
- इयत्ता चौथी धूळपेरणी कविता
- रानपाखरा कविता इयत्ता तिसरी
- आई वर छोट्या कविता संग्रह
आज या पोस्ट मध्ये आपण धरतीची आम्ही लेकरं ही कविता बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
Post a Comment