Header Ads

इयत्ता चौथी धूळपेरणी कविता | Iyatta Chouthi Dhulperani Kavita Marathi


नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला इयत्ता चौथी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धूळपेरणी ही कविता वाचायला मिळेल. या कवितेचे कवी आहेत अशोक कौतिक कोळी. चला तर मग बघूया इयत्ता चौथी धूळपेरणी कविता -

इयत्ता चौथी धूळपेरणी कविता

असो बरकत धूळपेरणी ला,
मातीचा जीव झुरणीला
हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला
टिपूर मोत्यांची आज मोरनीला
असो बरकत धूळपेरणी ला,
मातीचा जीव झुरणीला

येऊ नये कधी दिवस जाचक
कासावीस डोळे बनले चातक
असो बरकत धूळपेरणी ला,
मातीचा जीव झुरणीला .

कोरडे नक्षत्र पूर पापणीला
आलेले अभूट दूर दाटणीला
असो बरकत धूळपेरणी ला,
मातीचा जीव झुरणीला

मिळता डोळ्यांना मेघूट इशारे
मातीच्या कणांना फुटले धुमारे
असो बरकत धूळपेरणी ला,
मातीचा जीव झुरणीला

- अशोक कौतिक कोळी



तर आज आपण या पोस्टमध्ये इयत्ता चौथी धूळपेरणी कविता बघितली. अधिक मराठी कवितांसाठी ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.