Header Ads

Laxmi Stotra In Marathi - ।। श्री महालक्ष्मी स्तोत्र ।।


नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये तुम्हाला Laxmi Stotra In Marathi वाचायला मिळतील . हे महालक्ष्मी चे आवडते स्तोत्र आहे असे मानले जाते . इन्द्रदेवानी लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी या स्तोत्रा ची स्थापना केली . या स्तोत्रा ची कथा आपण खाली बघू.

    महालक्ष्मी स्तोत्रामागची कथा काय आहे ??


    एकदा देवराज इंद्र ऐरावत हत्ती वर बसून जात होते. रस्त्यामध्ये त्यांना दुर्वास ऋषी भेटले. ऋषींनी आपल्या गळ्यातील माळ काढून इंद्रदेवाकडे फेकली. जी इंद्राणी त्यांच्या हत्तीच्या गळ्यामध्ये घातली. माळेच्या उग्र वासाने प्रभावित होऊन हत्तीने सोंडेने ती माळ काढून जमिनीवर फेकली. हे बघून दुर्वास ऋषींना वाईट वाटले आणि त्यांनी इंद्राला शाप देत म्हटलं कि , " हे इंद्र , ऐश्वर्याच्या गर्वामुळे तुम्ही मी दिलेल्या माळेचा आदर नाही करू शकलात . हि नुसती माळ नव्हती हि लक्ष्मीची धान होती. म्हणूनच तुझ्याकडे असलेली सर्व लक्ष्मी गायब होऊन जाईल.
      

    दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्राची सर्व लक्ष्मी समुद्रामध्ये प्रविष्ट झाली. तेव्हा इंद्रदेवाने भक्तिभावाने माता लक्ष्मीची स्तुती या स्तोत्राच्या माध्यमातून केली आहे. लक्ष्मीचे सुंदर वर्णन यामध्ये केलेले आहे. या स्तोत्राचा उल्लेख पदम पुराणामध्ये आढळून येतो.

    सर्व देवतांच्या प्रार्थनेनंतर जेव्हा ती प्रकट झाली तेव्हा तिचा सर्व देवांनी ऋषी मुनी यांनी अभिषेक केला. देवी महालक्ष्मीच्या कृपने संपूर्ण विश्व् समृद्धीने आणि सुख शांतीने भरून गेले. आणि हर्षित होऊन इंद्रदेवानी लक्ष्मीची स्तुती महालक्ष्मी स्तोत्रामध्ये केली. ज्यामुळे माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली.


    महालक्ष्मी स्तोत्राचे फायदे कोणते आहेत ??


    • या स्तोत्राचा पाठ केल्याने माता लक्ष्मीच्या कृपेने आपले जीवन धन , वैभव समृद्धी यांनीही परिपूर्ण होते.
    • धार्मिक मान्यते अनुसार जो व्यक्ती दिवसातून एकदा या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व पाप नष्ट होते. जो व्यक्ती दोन वेळा पाठ करतो त्याला धन आणि धान्याची प्राप्ती होते. आणि जो व्यक्ती दिवसातून तीन वेळा स्तोत्राचा पाठ करतो त्याच्यावर लासखानी माता नेहमी प्रसन्न राहते.
    • शुक्रवार हा दिवस देवीला समर्पित आहे . या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. म्हणून रोज नाही करू शकत तरी या दिवशी महालक्ष्मी स्तोत्राचा पाठ जरूर करावा.
    • या स्तोत्राचा पाठ केल्याने आयुष्यात सफलता प्राप्त होते.
    • जर तुम्हाला शत्रूपासून खूप त्रास होत असेल तर शत्रूपासून तुम्हला या स्तोत्रामुळे मुक्ती मिळते.
    • महालक्ष्मीचे प्रिय असे हे स्तोत्र असल्यामुळे तुम्ही जर याचा पाठ ण करता नुसते हे ऐकले तरी लक्ष्मी मातेची अपर कृपा तुमच्यावर होते.
    • जीवनात धन संबंधी कोणतीही समस्या असेल तर या स्तोत्राच्या पाठाने, श्रवणाने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन धन ऐश्वर्याची प्राप्ती होते.
    • महालक्ष्मीच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते.
    • तसेच या स्तोत्रामुळे सर्व प्रकारच्या भौतिक सुख सुविधांची प्राप्ती होते.
    • नोकरी , व्यापार जे पण काम तुम्ही धन कमावण्यासाठी करत असाल त्यामध्ये सफलता मिळते. धन आगमनाचे नवे रस्ते बनतात.


    Mahalaxmi Stotra - Marathi


    सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे।
    सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे।।1।।

    त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी।
    हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी।।2।।

    एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी।
    त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी।।3।।

    कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे।
    डोलता सुरनायकावरि हालताती चंचले।।4।।

    कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती।
    पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती।।5।।

    पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी।
    सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी।।6।।

    कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या।
    गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या।।7।।

    इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती।
    कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती।।8।।

    निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी।
    किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी।।9।।

    कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी।
    चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी।।10।।

    नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते।
    जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते।।11।।

    संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके।
    कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके।।12।।


    || जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||


    ॥ महालक्ष्म्यष्टकम ॥



    नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
    शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥१॥

    नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
    सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥२॥


    सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरि।
    सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥३॥


    सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
    मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥४॥


    आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।
    योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥५॥


    स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।
    महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥६॥


    पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि।
    परमेशि जगन्मातर् महालक्ष्मि नमोऽस्तुते॥७॥


    श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते।
    जगत्स्थिते जगन्मातर् महालक्ष्मि नमोऽस्तुते॥८॥


    महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः।
    सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा॥९॥


    एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
    द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः॥१०॥

    त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
    महालक्ष्मिर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा॥११॥


    ॥ इति श्री महालक्ष्मीस्तव ॥




    हे पण वाचा 👇👇👇

    तर मित्रांनो , आज आपन Laxmi Stotra In Marathi बघितले. अश्याच भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

    धन्यवाद !!!!!!!!!




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.