रडु नको बाळा स्वामी पाठीशी आहे Lyrics | Swami Samarth Song Marathi
🙏🙏🙏नमस्कार रडु नको बाळा स्वामी पाठीशी आहे Lyrics बघणार आहोत.
______________
🌸रडु नको बाळा स्वामी पाठीशी आहे Lyrics | Marathi🌸
!! श्री स्वामी समर्थ !!
रडु नको बाळा, स्वामी पाठीशी आहे.
पाठीशी आहे, कृपा दृष्टीने पाहे !!
स्वामी दर्शना, चल मठात जाऊ.
मठात जाऊ, चरणी मस्तक ठेऊ !!
मूर्ती पाहुनी, दैन्य दु:ख ते हरते.
दु:ख ते हरते, सुख दारी हो येते !!
पाहुनी स्वामीना, सारी चिंता ही मिटते.
चिंता ही मिटते, भक्ती भाव जगविते !!
स्वामी समर्थ, वाच्या नाम ही जपते.
नाम ही जपते, सारी संकट हरते !!
श्रद्धेने स्मरता, भय दूर ते पळते.
भय दूर ते पळते, अंगी बळ हे मिळते !!
स्वामी जपाने, इच्छा पूर्ण ती होते.
इच्छा पूर्ण ती होते, सुख शांती मिळते !!
गुरू कृपेची, महती हो येते.
महती हो येते, अनुभूती मिळते !!
गुरू कृपेने, शांती मनाला मिळते.
शांती मनाला मिळते, जीवन आनंदी होते !!
गुरू माऊली, आशीर्वाद हो देते.
आशीर्वाद हो देते, उभी पाठीशी राहते !!
❇ ❇ ❇ ❇ ❇
🌸रडु नको बाळा स्वामी पाठीशी आहे Lyrics | English🌸
!! Shri Swami Samarth !!
Radu Nako Bala, Swami Pathishi Ahe.
Pathishi Ahe, Krupa Drushtine Pahe !!
Swami Darshana, Chal Mathat Jau.
Mathat Jau, Charani Mastak Thevu !!
Murti Pahuni, Dainya Dukh Te Harate.
Dukh Te Harate, Sukh Dari Ho Yete !!
Pahuni Swamina, Sari Chinta Hi Mitate.
Chinta Hi Mitate, Bhakti Bhav Jagavite !!
Swami Samarth, Vachya Naam Hi Japate.
Naam Hi Japate, Sari Sankat Harate !!
Shraddhene Smarata, Bhay Dur Te Palte.
Bhay Dur Te Palte, Angi Bal He Milte !!
Swami Japane, Ichha Purna Ti Hote.
Ichha Purna Ti Hote, Sukh Shanti Milte !!
Guru Krupechi, Mahati Ho Yete.
Mahati Ho Yete, Anubhuti Milte !!
Guru Krupene, Shanti Manala Milte.
Shanti Manala Milte, Jeevan Anandi Hote !!
Guru Mauli, Aashirvad Ho Dete.
Aashirvad Ho Dete, Ubhi Pathishi Rahate !!
❇ ❇ ❇ ❇ ❇
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी Lyrics
- सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics
- आदी तूच अंती तूच सर्व ठाई Lyrics
- जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये रडु नको बाळा स्वामी पाठीशी आहे Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment