माझे घड्याळ कविता✨जुन्या आठवणीतील कविता
🙏🙏🙏नमस्कार माझे घड्याळ कविता बघणार आहोत.
______________
🕥माझे घड्याळ कविता | Marathi🕥
घड्याळ माझे नवे असे;
सुंदर दिसते पहा कसे !
दादाचे तर जुने मुळी;
झुरळांची वाटे खोली !
घड्याळ माझे लखलखते;
सांग कोणते आवडते ?
'उगाच वटवट बोलु नये
कटकट कोणा करू नये;
-तूच नाहि का म्हणत असे ?
किटकिट त्याची सदा असे.
दिवसा किटकिट,
रात्री किटकिट,
घड्याळ माझे गुणी मुळी
कटकट कधि ना करी खुळी !
गडबड करिता मार मिळे,
हेडि न त्याला कसे कळे ?
रात्री निजण्याच्या वेळी
दादा त्याचा कान पिळी;
कुरकुरते, परि ना खळते,
रागाने चिडुनी जाते;
झोप लागते दादाला,
ते नच खपते पण त्याला;
पहाट होता गुरगुरते,
दादाला जागे करते.
दादा उठतो,
चिमटा घेतो,
तेव्हा मग ते गप्प बसे,
घड्याळ माझे कपि न असे !
✧✧✧✧✧
🕥माझे घड्याळ कविता | English🕥
Ghadyaal Majhe Nave Ase;
Sundar Disate Paha Kase!
Dadache Tar June Muli;
JhurLanchi Vate Kholi!
Ghadyaal Majhe Lakhalakhate;
Sang KontE Aavadate?
‘Ugach Vatvat Bolu Naye
Katkat Kona Karu Naye;
Tuuch Nahi Ka Mhanat Ase?
Kitkit Tyachi Sada Ase.
Divasa Kitkit,
Ratri Kitkit,
Ghadyaal Majhe Guni Muli
Katkat Kadhi Na Kari Khuli!
Gadbad Karita Mar Mile,
Hedi Na Tyala Kase Kale?
Ratri Nijnyachya Veli
Dada Tyacha Kan Pili;
Kurk urte, Pari Na Khalte,
Ragane Chiduni Jate;
Jhop Lagate Dadala,
Te Nach Khapate Pan Tyala;
Pahat Hota Gurgurate,
Dadala Jage Karte.
Dada Uthato,
Chimta Gheto,
Tevha Mag Te Gapp Base,
Ghadyaal Majhe Kapi Na Ase!
✧✧✧✧✧
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________
👀तर आज या पोस्टमध्ये माझे घड्याळ कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment