-->

Header Ads

विदूषक मराठी कविता | जुन्या आठवनीतील कविता



🙏🙏🙏नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण विदूषक मराठी कविता बघणार आहोत. मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात 1976 साली प्रकशित झालेल्या पुस्तकात हि कविता अभ्यासाला होती वृन्दा लिमये या कवितेच्या कवियत्री आहेत. जर तुम्ही हि अभ्यासली असेल तर हि कविता वाचून नक्कीच तुमच्या आठवणींना उजाळा मिळेल. चला तर मग वळूया कवितेकडे -

______________


💂विदूषक मराठी कविता | Marathi💂

सर्कस होती झकपक
बावळट त्यात विदूषक

काय पण होते रंगीत ध्यान
जिकडेतिकडे लुडबुड छान

मात्र त्याने केली कमाल
उडवून दिली भलतीच धमाल

उंचावरून मारली उडी
सर्वांच्यावर केली कडी

सगळ्यांशी त्याची झटापट
टपला मारल्या फटाफट

डोळे असे मिचकावले
वेडावून छान दाखवले

नाकावर त्याने ठेवले बोट
हसून हसून दुखले पोट

- वृन्दा लिमये

✻ ✻ ✻ ✻ ✻



💂विदूषक मराठी कविता | English💂

Sarkas Hoti Zhakpak
Bavalt Tyat Vidushak

Kay Pan Hote Rangit Dhyan
Jikadetikade Ludbud Chhan

Matr Tyane Keli Kamal
Udavun Dili Bhaltich Dhamal

Unchavarun Marli Udi
Sarvanchyavar Keli Kadi

Saglyanshi Tyachi Zhatapat
Tapla Marlya Fatafat

Dole Ase Michkavle
Vedavun Chhan Dakhavle

Nakavar Tyane Thevle Bot
Hasun Hasun Dukhle Pot

— Vrunda Limaye

✻ ✻ ✻ ✻ ✻


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________

👀तर आज आपण विदूषक मराठी कविता बघितली. तुम्हाला अजून कोणत्या कविता हव्या असतील तर त्या कंमेंट मध्ये नक्की सांगा.😄😄 आणि पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!!!

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.