-->

Header Ads

रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या Lyrics | Rakhumaichya Save Tumhi Faralala Ya



🙏🙏🙏नमस्कार रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या Lyrics बघणार आहोत.

______________


🌷रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या Lyrics | Marathi🌷

आज आहे एकादशी ध्यानामध्ये घ्या
देवा तुम्ही फराळाला लवकर या
वारकरी विठू भक्त निष्ठले पहा
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || धृ ||

चंदनाचे पाट, चांदीचे ताट
समया चार, फराळाचा थाट
उदबत्तीचा सुवास देवा तुम्ही घ्या
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || १ ||

नाना केले पकवान मी पुढे मांडते
भगरीच्या खिचडी वर आमटी देते
बटाट्याच्या भाजीचा स्वाद तुम्ही घ्या
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || २ ||

उपवासाच्या चकल्या, शिंगाड्याची बोंडे
फराळाचा चिवडा, खीर - बर्फी - पेढे
राजगिऱ्याचा गरम शिरा सावकाश घ्या
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ३ ||

ताजे दूध आणून या बासुंदी केली
चांदीच्या या वाटीमध्ये तुम्हा अर्पिली
श्रीखंडाची वडी तुम्ही उचलून घ्या
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ४ ||

फराळ झाल्यावर हा सुवर्ण पेला
गंगाजल देते देवा तुम्हा पिण्याला
लवंग वेलदोड्याची मुखशुद्धी तुम्ही घ्या
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ५ ||

हात जोडून या एक करते विनंती
शरण आली दासी प्रभू तुमच्या चरणाशी
आशीर्वाद देऊनीया निरोप आता घ्या
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या || ६ ||

आज आहे एकादशी ध्यानामध्ये घ्या
देवा तुम्ही फराळाला लवकर या

वारकरी विठू भक्त निष्ठले पह
रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या ||

❖ ❖ ❖ ❖



🌷रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या Lyrics | English🌷


Aaj Ahe Ekadashi Dnyanamadhye Ghya
Deva Tumhi Faralalaa Lavkar Ya
Varkari Vithu Bhakt Nishthale Paha
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. || Dhru. ||

Chandanache Pat, Chandiche Tat
Samaya Char, Faralacha That
Udbatticha Suvas Deva Tumhi Ghya
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. || 1 ||

Nana Kele Pakwan Mi Pudhe Mandte
Bhagrichya Khichadivar Aamti Dete
Batatyachya Bhajicha Swad Tumhi Ghya
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. || 2 ||

Upvasachya Chaklya, Shingadyachi Bonde
Faralacha Chivda, Khir – Barfi – Pedhe
Rajgiryacha Garam Shira Savkash Ghya
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. || 3 ||

Taje Dudh Aanun Ya Basundi Keli
Chandichya Ya Vatimadhye Tumha Arpili
Shrikhandachi Vadi Tumhi Uchhalun Ghya
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. || 4 ||

Faral Jhalyavar Ha Suvarna Pela
Gangajal Dete Deva Tumha Pinyala
Lavang Veldodyachi Mukhshuddhi Tumhi Ghya
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. || 5 ||

Hat Jodun Ya Ek Karte Vinanti
Sharan Aali Dasi Prabhu Tumchya Charanashi
Ashirvad Deuniya Nirop Ata Ghya
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. || 6 ||

Aaj Ahe Ekadashi Dnyanamadhye Ghya
Deva Tumhi Faralalaa Lavkar Ya
Varkari Vithu Bhakt Nishthale Paha
Rakhumaichya Save Tumhi Faralalaa Ya. ||

❖ ❖ ❖ ❖



✅हे पण नक्की वाचा👇👇👇


______________


👀तर आज या पोस्टमध्ये रखुमाईच्या सवे तुम्ही फराळाला या Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.