मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला Lyrics | Chandan Kamble
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला Lyrics बघणार आहोत.
सॉंग - मरून पुन्हा जन्म घ्यावा
लिरिक्स - विष्णू देडे, साजन बेंद्रे
सिंगर - विष्णू देडे, बाळू शिंदे, चंदन शिंदे
म्युझिक लेबल - टी ट्रॅक स्टुडिओ
__________________
🙏मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला Lyrics 🙏
नाव तुझ घेऊन पडली कोरड ओठाला..
कोरड ओठाला...
मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला..|| धृ ||
किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी वाहवा
शेवट आला करावा लागतो गुरुचाच धावा
कैकनी गुरु सेवेत देह घोटला
देह घोटला....
मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला..|| १ ||
रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य
गुरु शिवाय आहे जीवन सारं शून्य
नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला
तुझ्या थाटामाटाला...
मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला..|| २ ||
गुरुशिवाय तुरे अर्धवट राहशील
देवाधिक चारीधाम गुरूमध्ये पाहशील
संतोषाने येडू चरणी देह लोटला
देह लोटला...
मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला..|| ३ ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment