-->

Header Ads

गुलाल उधळला देवा भक्तीगीत Lyrics | Khanderaya Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण गुलाल उधळला देवा भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.

__________________

🌷गुलाल उधळला देवा भक्तीगीत Lyrics 🌷


|| कोतवाल तू काशीचा
सरसेनापती झाला इथे
सरला अंधार भैरवा
पाऊल तुझे पडले जिथे ||

डवर वाजला देवा तुझा नगर वाजला
गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला.. || धृ ||

तुझ्या पालखीच्या समोर हलगी तुतारीचा नाद
तुझ्यासाठी जीव वेडा भक्त घालतिया साद
काळजाचा ताल सूर गगनाला भिडला
गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला.. || १ ||

हळद देवाला लागती जोधु नवराई लाजती
लाखात एक जोडा शंभू पार्वती साजती
पाहून लग्न सोहळा मनी आनंद भरला
गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला.. || २ ||

तुला बगाडाचा मान देतोया कौल नेमान
जीव ठेवूनी पायाशी दिले बगाड्या थाटान
संकाचा तू नाथ खरा पावती नवसाला
गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला.. || ३ ||

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण गुलाल उधळला देवा भक्तीगीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents